मनसे-भाजपची मनं जुळणार ? BJP च्या ‘या’ बड्या नेत्यानं दिले ‘संंकेत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसेनं आपल्या पहिल्या राज्यवापी महाअधिवेशनात नव्या झेंड्याचे अनावरण केले. त्यानंतर आता भाजपकडून मनसेसोबत मन जुळण्याचे संकेत मिळत आहेत. पक्षाची भूमिका राज ठाकरेच जाहीर करतील असे मनसे नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आज महाअधिवेशनातून अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करतील. तेव्हा मनसेची आगामी भूमिका काय असणार हे स्पष्ट होईल. तत्पूर्वी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मनसेला सोबत घेण्याचे संकेत दिलेत.

मनसेकडून भगव्या झेड्यांचे अनावरण करण्यात आले. या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या हिंदवी स्वराज्याचे प्रतीक असलेली राजमुद्रा असणार आहे. त्यामुळे मनसे हिंदुत्वाची कास पकडणार हे स्पष्ट झालं. परंतु त्यानंतर मनसेने विचारधारा बदलल्यास एकत्र येऊ असे संकेत भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी दिले आहेत. मुनगंटीवर यांनी मनसेबद्दल बोलताना महाविकासआघाडीचा संदर्भ देत सवाल केला की ते सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात तर मग आम्ही सत्तेसाठी सोबत का येऊ शकत नाही.

सुधीर मुनगंटीवर यांनी मनसेच्या या नव्या भूमिकेचे स्वागत केले. भाजप-मनसे युतीचे संकेत देखील त्यांनी दिलेत. परंतु मनसेची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. थोड्याच वेळात राज ठाकरे मनसे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. तेव्हाच पक्षांची भूमिका स्पष्ट होईल असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. गोरेगावच्या नेस्को मैदानात मनसेचे पहिले महाअधिवेशन होत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

 

You might also like