Gopichand Padalkar | शरद पवार साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी, त्यांना मी मोठं मानत नाही, गोपीचंद पडळकर यांची टीका (व्हिडिओ)

सोलापूर (Solapur) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार (Sharad Pawar) हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. त्यांचे तीन खासदार (MP) आहेत, त्यांना मोठं कोण मानणार. तुम्ही मानणार असाल तर मला त्याचं देणंघेणं नाही, असे म्हणत गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) सोलापूर (Solapur) येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

भाजप हाच सर्वात मोठा पक्ष

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) पुढे म्हणाले, ही लोकशाही (Democracy) आहे. या राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष (BJP is the largest party in the state) आहे. या राज्यात सर्व ओबीसी समाजापर्यंत (OBC community) जाणं हे माझं काम आहे. मला ओबीसींचा नेता (OBC leader) म्हणावं असं माझं म्हणणं नाही, असेही पडळकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.

बहुजनांचा आवाज दाबला जात आहे

महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi government) आल्यापासून समाजात तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मूठभर लोकांकडून बहुजनांचा (Bahujan) आवाज दाबला जात आहे. ओबीसींना (OBC) दिलेले संविधानिक अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी म्हटलं आहे.

भावी पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी तिसऱ्या आघाडीवरुन शरद पवार (Sharad Pawar)यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, मी लहान असल्यापासून ऐकतो आहे शरद पवार पंतप्रधान (PM) होणार. मागील 30 वर्षापासून ते भावी पंतप्रधान (PM) आहेत. त्यांना भावी पंतप्रधानपदासाठी (PM) शुभेच्छा आहेत, असा टोला गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी लगावला.

मला संस्कार शिकवण्याची गरज नाही

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची कन्या शरयू देशमुख (Sharu Deshmukh) यांनी गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर टीका केली होती. पात्रतेपेक्षा जास्त भेटलं की असं होतं, असं म्हणत शरयू देशमुख (Sharu Deshmukh) यांनी पडळकरांना संस्कार शिकवले होते. यावर बोलताना पडळकर म्हणाले, राज्यातील काही घराणे हे अतिसुसंस्कृत आहेत. मी एका शिक्षकाचा मुलगा (son of teacher) आहे. तुमच्या विरोधात बोललो की लगेच असंस्कृतपणा दिसतो. त्यामुळे मला संस्कार शिकवण्याची गरज नाही, असे प्रत्युत्तर पडळकर यांनी दिले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : bjp leader gopichand padalkar criticizes ncp supremo sharad pawar said he not big leader me

हे देखील वाचा

Corona side effects | कोरोना संसर्गाचा आणखी एक साईड इफेक्ट !
आता शौचातून ब्लिडिंगची 5 प्रकरणे आली समोर, एकाचा मृत्यू

8 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पोलीस ‘युनिट’मध्ये कार्यरत असणाऱ्या PSI, API,
पोलीस निरीक्षकाची इतर ठिकाणी होणार बदली

Form 16 काय आहे आणि तो कुठे उपयोगी पडतो, जाणून घ्या याच्याशी संबंधीत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर