भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी कन्येसह पुण्यात घेतली राज्यपालांची भेट

पोलिसनामा ऑनलाईन, इंदापूर, दि. 18 ऑगस्ट : भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. पुण्यात झालेल्या या भेटीच्या वेळी हर्षवर्धन यांच्या कन्या आणि पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ह्या देखील उपस्थित होत्या. भेटीमुळे अधिक जिद्दीने काम करण्यास विचारांची नवीन ऊर्जा मिळाली आहे, असे अंकिता पाटील यांनी यावेळी सांगितले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना प्रशासन आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव यावेळी त्यांच्या बोलण्यातून आणि संकल्पनेतून जाणवला. सोमवारी चर्चेत राज्यपाल कोश्यारी यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांनी विविध विषयांवर संवाद साधला.

युवा पिढीने राजकारणात सक्रीय होऊन जनसेवा करावी, यासाठी ते आग्रही दिसले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेकडे सकारात्मक विचारांची मोठी शिदोरी आहे, असेही हर्षवर्धन पाटील असे म्हणाले,

राज्यपाल हे प्रचंड अनुभवी आणि या वयातही जिद्दीचे व्यक्ती असल्याचे जाणवले. त्यांच्या अनुभवाचा फायदा महाराष्ट्र राज्याला निश्चितपणे होईल, असा विश्वास देखील हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलाय.

यावेळी चर्चेत जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनीही सहभाग घेतला. राज्यपालांशी झालेल्या भेटीमुळे अधिक जिद्दीने काम करण्यासाठी विचारांची नवीन ऊर्जा मिळाली आहे, असे अंकिता पाटील यांनी सांगितले आहे.

नुकताच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त प्रभार सोपविला आहे. गोवा राज्याचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांची बदली झाल्याने कोश्यारी यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी सोपविली आहे. गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची बदली मेघालयच्या राज्यपालपदी केली आहे.