६०० कोटीच्या घोटाळ्यात भाजपच्या ‘या’ नेत्याला झाली अटक 

कर्नाटक : वृत्तसंस्था – पॉन्जी इन्वेस्टमेंट घोटाळ्या प्रकरणी भाजपच्या कर्नाटकातील बडे नेते माजी राज्यमंत्री जनार्दन रेड्डी यांना सेंट्रल क्राइम ब्रँचने  आज रविवारी अटक केली आहे.  पॉन्जी इन्वेस्टमेंट घोटाळा हा ६०० कोटींचा आहे. त्यामुळे भाजपच्या  प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. जनार्दन रेड्डी यांच्यावर  मनी लाँड्रिंगचा आरोप ठेवण्यात आला असून या प्रकरणातील मुख्य आरोपीशी आर्थिक व्यवहार ठेवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

त्याच प्रमाणे रेड्डी यांचे साथीदार असलेल्या  महफूझ अली खान यालाही या प्रकरणी अटक करण्यात अली आहे. जनार्दन रेड्डी यांना न्यायालयाने २४ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

जनार्दन रेड्डी शनिवारी तपास संस्थे पुढे हजर झाले होते. जनार्दन रेड्डी यांना सबळ पुराव्याच्या आधारावर अटक करण्यात आली असून त्यांच्या जप्त केलेल्या पैशातून गुंतवणूकदारांचे देणे देण्यात येईल अशी माहिती क्राइम ब्रँचचे सीपी आलोक कुमार यांनी  दिली आहे . जनार्दन रेड्डी यांच्या अटके नंतर कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. रेड्डी आणि खान यांनी  अँबिडेट मार्केटिंगकडून १८ कोटी रुपयांचे सोने खरेदी केले होते.त्याचे वजन ५७ किलो एवढे होते.सदरचे सोने प्रवर्तन निर्देशनालयाच्या अधिकाऱ्यापासून  अँबिडेंटचे प्रमोटर सय्यद अहमद फरीद यांना चौकशीत ढील देण्यासाठी घेतले गेले होते. क्राईम ब्रँचने खान आणि रेड्डी यांना चौकशी संदर्भातील नोटीस पाठवले गेले होते.या प्रकरणात जनार्दन रेड्डी यांचे भवितव्य टांगणीला लागले असून आगामी काळात हे प्रकरण काय वळण घेते याकडे कर्नाटकातील बड्या नेत्यांचे लक्ष लागला आहे.

आपणाला केलेली अटक हे एक राजकीय षडयंत्र असून आपण यातून निर्दोष सुटू असा विश्वास जनार्धन रेड्डी यांनी व्यक्त केला आहे.शनिवारी त्यांच्या वक्तव्याचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत होता त्यात ते म्हणत होते कि,पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे परंतु ते कुणाच्या तरी सांगण्यावरून मीडियाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच मी पळून गेलो अशा अफवा पसरल्या जात आहेत परंतु मी कुठेही गेलो नसून मी शहरातच आहे आणि पोलिसांना तपासासाठी सहकार्य करणार आहे. असा व्हिडीओ प्रसारित केल्यावर रेड्डी पोलिसात हजर झाले आणि त्यानंतर त्यांना आज अटक करत असल्याचे सेंट्रल क्राइम ब्रँचने जाहीर केले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like