BJP Leader Jitu Chaudhary Shot Dead | भाजप नेत्याची भररस्त्यात 6 गोळ्या झाडून निघृण हत्या, प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्त संस्था – BJP Leader Jitu Chaudhary Shot Dead | देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Dehli) भयंकर घटना घडली आहे. भाजप नेते जीतू चौधरी (BJP Leader Jeetu Chaudhary Murder Case) यांची 6 गोळ्या झाडून हत्या ( Crime News) करण्यात आली आहे. गाझीपूर पोलीस स्टेशनच्या (Ghazipur Police Station) परिसरात ही घटना घडली. जीतू सिंह मयूर विहार (Mayur Vihar) जिल्ह्याचे भाजपचे मंत्री होते.

जीतू चौधरी बांधकाम व्यावसायिक (Builder) होते त्यांचा एका ठेकेदारासोबत पैशांवरून वाद सुरू होता. त्यामुळे त्यांची हत्या याच व्यवहारातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. बुधवारी रात्रीच्यावेळी त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी आठच्या सुमारास गोळ्या (Firing) झाडल्या त्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल केलं होतं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

गाझीपूर पोलीस स्टेशनच्या बीट कर्मचाऱ्यांना पेट्रोलिंगदरम्यान (Patrolling) मयूर विहार परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसली. त्यावेळी तिथे जीतू चौधरी हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. संबंधित कलमांनुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी आम्ही पुढील तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, या घटनेमुळे तेथील परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
घटनास्थळावरून रिकामी काडतुसे आणि काही इतर महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
प्रत्यक्षदर्शी आणि तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title : BJP Leader Jitu Chaudhary Shot Dead | bjp leader jitu chaudhary shot dead
in ghazipur police station case delhi

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा