काँग्रेसमध्ये सक्षम नेत्यांना किंमत नाही : ज्योतिरादित्य शिंदे

पोलिसनामा ऑनलाईन टीम – काँग्रेस पक्षात सक्षम नेत्यांवर प्रश्न उपस्थित केले जातात. माजी सहकारी सचिन पायलटदेखील अशाच परिस्थितीतून गेले आहेत, असे मत भाजपचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केले आहे. काही महिन्यांपूर्वी शिंदे यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर टीकाही केली होती.

काँग्रेस पक्षात सक्षम नेत्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते ही बाब दु:खद असून या परिस्थितीतून माझे माजी सहकारी सचिन पायलट हेदेखील गेले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे शिंदे यांनी कौतुक केले आहे. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आले, अयोध्येत राम मंदिराचं पूजनही करण्यात आले.

त्याशिवाय चीन त्यांच्या भाषेत प्रत्युत्तरही दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणत्याही व्यक्तीबाबत करण्यात येणार्‍या आक्षेपार्ह विधानावर कठोरपणे कारवाई केली पाहिजे या मताचा मी आहे, अंसही त्यांनी स्पष्ट केलं. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी 1985 मध्ये तत्त्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांनी राम मंदिराची कुलुपं उघडल्याचं म्हटले होते. यावर शिंदे यांनी भाष्य केलं.