भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांची अधिकार्‍याला ‘खुलेआम’ धमकी, म्हणाले – ‘शहरामध्ये आग लावेल’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या विवादित भाष्यांवर नेहमी चर्चेत असणारे भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भाजपा महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी मध्यप्रदेश मधील इंदूर शहराला आग लावण्याची धमकीच दिली आहे. झालेला प्रकार असा की, भाजपा नेत्यास इंदूरचे डिव्हिजनल कमिश्नर आकाश त्रिपाठी यांना भेटायचे होते. परंतु त्यांनी भेटण्यास नकार दिला. त्यामुळे कैलास विजयवर्गीय यांना प्रचंड राग आला. आणि त्यांनी कुठलाही विचार न करता इंदूर शहरास आग लावेन असे विवादित वक्तव्य करत अधिकाऱ्यास धमकी दिली.

वास्तविक, कैलास विजयवर्गीय शहरातील समस्यांचा प्रश्न सुटावा यासाठी कमिश्नरच्या घराबाहेर धरणास बसले होते. विजयवर्गीय ने म्हणाले की आम्हाला भेटण्यासाठी अधिकाऱ्यांकडे वेळ नसतो, हे इतके मोठे झाले काय? परिणामी, संतापात त्यांनी शहराला आग लावण्याची धमकीच देऊन टाकली.

आकाश विजयवर्गीय यांनी अधिकाऱ्यावर चालवली होती बॅट

विशेष म्हणजे कैलासवर्गीय यांची गणती भाजपाच्या दिग्गज नेत्यांमध्ये होते. त्यांचा मुलगा आकाश विजयवर्गीय देखील अधिकाऱ्याला मारल्याप्रकरणी चर्चेत होता. इंदूरमधील एका जर्जर इमारतीस पाडण्यासाठी निगमच्या टीममधील अधिकाऱ्यावर आकाश विजयवर्गीय याने बॅट चालवली होती. या घटनेनंतर आकाश विजयवर्गीयवर कारवाई करण्यात आली आणि त्यास ५ दिवस कोठडीत राहावे लागले होते. नंतर भोपाळ च्या विशेष न्यायालयाकडून आकाश विजयवर्गीयची जमानत करण्यात आली होती.

या घटनेनंतर देशभरात भाजपावर टीका होत होती. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील भर सभेत आकाश विजयवर्गीय यास चुकीचे ठरवले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/