मदरशांवर बंदी आवश्यक, विरोध केल्यास मेहबुबांना अटक करा !

श्रीनगर : वृत्तसंस्था – देशातल्या प्राथमिक मदरशांवर बंदी घालण्याची मागणी शिया वक्फ बोर्डाचे वसीम रिझवी यांनी केली होती . आता त्याला जम्मू कश्मीरचे भाजप नेते कविंदर गुप्ता यांनी समर्थन दिले आहे. दहशतवाद रोखण्यासाठी मदरशांवर बंदी आवश्यक असल्याचे मत कविंदर गुप्ता  यांनी केले आहे. एव्हढेच नाही तर जर जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी जमात-ए-इस्लामीचे समर्थन केले तर त्यांना अटक करायला हवी असे गुप्ता यांनी म्हंटले आहे.
एएनआय  या वृत्तसंस्थेशी  बोलताना गुप्ता म्हणाले की, ‘अफगाणिस्तान आणि अन्य काही देशांमध्ये संशयित कारस्थानांमुळे मदशांवर बंदी लगावण्यात आली आहे. याचप्रमाणे जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादावर नियंत्रण मिळवायचे असेल तर मदरशांवर बंदी आवश्यक आहे. तसेच जर जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी जमात-ए-इस्लामी ते समर्थन केले तर त्यांना अटक करायला हवी,’ असेही कविंदर गुप्ता म्हणाले. कविंदर गुप्ता हे जम्मू-कश्मीर लोकसभा क्षेत्राचे खासदार असून त्यांनी मुख्यमंत्रीपदही भूषवले आहे.
https://twitter.com/ANI/status/1103458923858853888
दरम्यान, यापूर्वी शिया वक्फ बोर्डाचे रिझवी यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पत्र लिहून मदरशांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती. देशभरातील जिहादी मदरशांवर सरकारने तत्काळ बंदी घातली पाहिजे. या मदरशांमधून इसिसची विचारधारा मुलांपर्यंत पोहचवली जाते, असा गंभीर आरोप लगावत त्यांनी ही बंदीची कारवाई करण्याची मागणी केली होती.