BJP Leader Keshav Upadhye । हा एक नवा हास्यास्पद प्रयोग; शरद पवारांच्या घरी होणाऱ्या बैठकीवरून भाजपाचा निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज (22 जून) रोजी राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि ‘राष्ट्रमंच’ या नावाखाली प्रमुख व्यक्तींची बैठक होती. हि बैठक बिगरकाँग्रेस घेण्यात आलीय. तर वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) राष्ट्रमंच’ यांचे प्रमुख आहेत. ते देखील उपस्थित होते. तर या बैठकीवरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्वीट करत निशाणा साधला आहे.(BJP’s target from the meeting held at Sharad Pawar’s house)

bjp leader keshav upadhye criticize ncp chief sharad pawar over rashtra manch meeting in delhi

केशव उपाध्ये (Keshav Upadhye) म्हणाले, ‘शरद पवार (Sharad Pawar)यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठकीत वीसजण उपस्थित असणाऱ्यांची यादी पहाता संभाव्य आघाडी हा राजकारणात जनाधार गमावलेल्या नेत्यांचा फक्त बातमीत राहण्यापुरता केविलवाणा प्रयत्न असून एक नवा हास्यास्पद प्रयोग यापलीकडे त्यातून काही निष्पन्न होणार नाही, अशी घणाघाती टीका उपाध्ये (Keshav Upadhye)यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि अन्य नेत्यांवर केली आहे. उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्विटच्या माध्यमातून ही टीका केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

तसेच, पुढे केशव उपाध्ये (Keshav Upadhye) म्हणाले, या बैठकीसाठी यशवंत सिंन्हा, पवन वर्मा, संजय सिंग, डी. राजा, फारुख अब्दुला, जस्टीस ए. पी. शाह, जावेद अखतर, के सी तुलसी, करन थापर, आशुतोष, माजीद मेमन, वंदना चव्हाण, एस वाय कुरेशी हे नेते उपस्थित असणार आहेत, असं देखील उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद केला आहे.

 

 

या दरम्यान, सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, केवळ सोयीचे ठिकाण म्हणून पवार यांचे निवासस्थान निवडले आहे.
स्वतः शरद पवार (Sharad Pawar) यांनी ही बैठक बोलावलेली नसल्याचे समजते.
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी या बैठकीत सहभागी होणाऱ्यांची यादी ट्विटछाया माध्यमातून प्रसिद्ध केली.
या बैठकीचे शिवसेनेला निमंत्रण नसल्याची माहिती होती.
शिवसेनेच्या नेत्याचे नाव यादीत नव्हते. यावरून महाविकास आघाडीतील सारं काही आलबेल आहे की नाही? याबातच्या चर्चा रंगल्या आहेत.

हे देखील वाचा

Gold Price Today | सोन्याचा दर पुन्हा वाढला, चांदीत किंचित घसरण; जाणून घ्या

माजी मंत्री विजय शिवतारे हॉस्पिटलमध्ये, मुलीनं लिहिली भावांबद्दल धक्कादायक Facebook पोस्ट

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : bjp leader keshav upadhye criticize ncp chief sharad pawar over rashtra manch meeting in delhi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update