Maharashtra Unlock : ‘अंधेरी नगरी चौपट राजा अशी महाविकास आघाडी सरकारची अवस्था’, भाजपचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात 5 टप्प्यात अनलॉकची घोषणा पत्रकार परिषदेत केली. त्यानंतर राज्य सरकारने स्पष्टीकरण देत अनलॉक केले नसल्याचे सांगितले. अनलॉकचा प्रस्ताव विचाराधिन असल्याचे स्पष्ट केले. यावरुन भाजपने BJP ठाकरे सरकारवर टीका केली आहे. अंधेरी नगरी चौपट राजा अशी महाविकास आघाडीची अवस्था झाल्याचा टोला भाजपने लगावला आहे.

 

सरकारच्या यु-टर्नवरुन टीका
अनलॉकची घोषणा केल्यानंतर सरकारने यु-टर्न घेतला. यावरुन भाजप BJP प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. अंधेरी नगरी चौपट राजा अशी राज्याची महाआघाडी सरकार करत आहे. कुणाचा कुणाला ताळमेळ नाही. विजय वडेट्टीवार प्रेस घेऊन अनलॉकडाऊन केल्याची घोषणा करतात. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीत निर्णय झाल्याचे सांगतात, काही वेळानंतर सरकारी प्रेसनोट येते. अनलॉकडाऊनचा प्रस्ताव आहे निर्णय नाही, असे उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

निर्बंध शिथिल करण्याचा प्रस्ताव विचाराधीन
निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन आहे. जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयी माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतर अधिकृत निर्णय कळविला जाईल. तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे हे उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल.

विजय वडेट्टीवारांचे घुमजाव
गफलत वगैरे काहीही नाही. बैठकीत 5 टप्पे ठरवण्यात आले आहेत.
त्याला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. ज्या भागातील जनतेनं सहकार्य केलं, त्या भागातला लॉकडाऊन या प्रक्रियेने कमी करायचा हे धोरण आपण ठरवलं आहे.
डिझास्टर मॅनेजमेंटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतात.
या निर्णयाला तत्वत: मान्यता मिळाली आहे.
एकूण पॉझिटिव्हिटी रेट किंवा ऑक्सिजन बेडच्या ऑक्युपन्सीच्या आधारावर निर्णय घेण्याचे ठरले आहे.
त्याला तत्वत: मान्यता मिळाली आहे.
यामध्ये टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन काढायचा याचा अंतिम आदेश मुख्यमंत्री काढतील, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.

READ ALSO THIS :

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे