आरे कारशेडवरून ‘ठाकरे सरकार’ची ‘अशी ही बनवाबनवी’, किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील आरे कारशेडच्या मुद्यावरुन भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. शिवसेना या प्रकरणात बनवाबनवी करत असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीचे हे सरकार डोळ्यात धूळफेक करत असल्याचे सोमय्या यांनी एका व्हिडीओद्वारे सांगितले आहे.

महाआघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. एक समिती देखील स्थापन केली. आता भाजपकडून ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. याबाबत शासन निर्णय काढण्यात आला आहे. मेट्रो कारशेडकरता सद्यस्थितीत निश्चित जागेत पर्यावरण समतोल करण्यासाठी उपाय सुचवणे, तसेच सद्य परिस्थितीत वेळेत काम पूर्ण करण्यासाठी उपाय योजना करणे आणि वाजवी किंमतीत अन्य पर्याय असल्यास सुचवणे, असे नव्या शासन निर्णयात म्हटले आहे. यावर किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर टीका करत हे सरकार बनवाबनवी करत असल्याचा आरोप केला.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2526032847495676&id=389251787840470

दिलेल्या आर्थिक परिस्थितीत वेळेत काम पूर्ण करण्यासाठी सध्याच्या जागेत कोणता पर्याय आहे, हे समितीने सांगायचे आहे. अन्यथा याच ठिकाणी कारशेडचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने पर्यावरण समतोल करण्यासाठी काय पावले उचलायची हे सूचवायचे आहे. असे तत्कालीन फडणवीस सरकारने हे सगळेच केले होते, असे सोमय्या यांनी सांगितले. एवढेच नाही तर कोर्टानेही ते मान्य केले आहे. मग ही धूळफेक का ? असा सवाल त्यांनी ठाकरे सरकारला केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/