भाजप नेत्याच्या चारित्र्यावर ‘संशय’, पतीनं गोळी मारून केली ‘हत्या’, सर्वत्र प्रचंड ‘खळबळ’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – हरियाणाच्या गुरुग्राममध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका महिला नेत्याची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नवऱ्यानेच तिची हत्या केल्याची समजते. हत्या केल्यानंतर आरोपी पती फरार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे.

ही घटना शनिवारी रात्रीची आहे. मृत मुनेश भाजपा किसान मोर्चाच्या पदाधिकारी होत्या. भाजप महिला मोर्चात अनेक पदे भूषविल्यानंतर सध्या त्या पक्षाच्या किसान मोर्चात सरचिटणीस होत्या. मुनेश राजकारणात सक्रिय असल्याने अनेकदा बाहेर जाऊन लोकांना भेटत असत. मात्र, नवरा सुनील गोदाराला हे आवडले नाही. तिच्या या भूमिकेबद्दल सुनील नेहमी तिच्यावर संशय घेत असे.

हत्येच्या रात्री शनिवारी रात्री 9.30 च्या सुमारास जेव्हा तो घरी परतला तेव्हा मुनेश आपल्या बहिणीशी व्हिडिओ कॉलवरून बोलत होती. एका व्हिडिओ कॉलवर त्याची पत्नी एखाद्याशी बोलत असल्याचे पाहून सुनीलचा ताबा सुटला. पती सुनील आणि मुनेश यांच्यात वाद सुरू झाला. त्यांनतर संतापलेल्या सुनीलने रिव्हॉल्व्हर काढून पत्नी मुनेशवर एकामागून एक दोन गोळ्या झाडल्या. दोन्ही गोळ्या मुनेशच्या छातीवर लागल्याने तिचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि ते घटनास्थळी पोहोचले पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. आरोपी नवरा घटनास्थळावरून फरार झाला. घटनेच्या वेळी आरोपी पती सुनील गोदारा दारूच्या नशेत असल्याचे समजते.

सुनील लग्नापासूनच तिच्या बहिणीला मानसिक त्रास देत असे, असा आरोप मुनेशच्या भावाने केला. 2001 साली दोघांचे लग्न झाले होते. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर तो एका सुरक्षा एजन्सीमध्ये पीएसओ म्हणून कार्यरत होता. तिच्या भावाच्या म्हणण्यानुसार, 2013 साली भाजपशी संबंधित होती. महिला मोर्चामध्येही त्यांनी अनेक पदे भूषवली. भावाचा असा आरोप आहे की ती घरीही बोलत असत, तर नवरा गोंधळ घालत असे. मुनेशच्या कुटुंबीयांनी तक्रार गुन्हा दाखल केली असून पोलीस आरोपी सुनील तपास घेत आहे.