खळबळजनक ! झारखंडमध्ये भाजप नेता मागो मुंडा, त्यांच्या पत्नी आणि मुलाची हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजप नेत्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार झारखंडमध्ये घडला आहे. झारखंडमध्ये झालेल्या या प्रकारात भाजप नेते मागो मुंडा यांच्यासह त्यांच्या पत्नीची आणि मुलाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात भाजप नेते मागो मुंडा यांना गोळ्या झाडण्यात आल्या. या प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

हा गंभीर प्रकार झारखंडमधील हेठगोवा, खुंटी या भागात घडला. या हल्लात मागो मुंडा यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. आज्ञात इसमांनी रात्री घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबतचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. या प्रकारणी आता पोलीस आसपासच्या लोकांची चौकशी करत आहेत. तर मागो मुंडा यांच्या मोबाइलमधील संपर्क देखील तपासत आहेत.

हा हल्ला का करण्यात आला त्यामागील कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणी सर्वांगाने विचार करुन तपास करत आहे. परंतू भाजप नेत्यांलाच लक्ष केल्याने सध्या परिसरात खळबळ उडाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त