भाजपच्या खासदाराचा घरचा आहेर, म्हणाले – ‘मोदी सरकारनंही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचकाच केला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – “मोदी सरकार आर्थिक आघाडीवर अयशस्वी ठरले आहेत”, असं भारतीय जनता पक्षाचे BJP राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवरला घरचा आहेर दिला आहे. एवढेच नाही, तर मोदी सरकारनेही अर्थव्यवस्थेचा पार विचका केला. माझ्या या बेलण्याला अधिकांश भारतीय लोक सहमत आहेत, असेही स्वामी यांनी म्हटले आहे. स्वामी यांनी ट्विट केले आहे, की आता अधिकांश भारतीय माझ्या या म्हणण्याशी सहमत आहेत, की मोदी सरकारने यूपीएकडून तयार झालेली अर्थव्यवस्थेतील गडबड आणखी वाढवली आहे. ही अर्थव्यवस्था अजूनही सुधारली जाऊ शकते. मात्र, सध्या हे कसे करायचे, हे सरकारला माहित नाही.

संसर्ग नियंत्रित करण्यास नैसर्गिक औषध उपयुक्त; जाणून घ्या

दरम्यान, भाजप BJP खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर एक दावा करत खळबळ उडवून दिली आहे. स्वामी यांच्या दाव्यानुसार देशात जेव्हा तिसरी लाट येईल तेव्हा त्यात लहान मुले, बालके मोठ्या प्रमाणावर प्रभावित होतील, यासाठी आजच काळजी घ्यावी लागेल, असेही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते. तत्पूर्वी, सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, नितीन गडकरींबाबाबतचा माझा प्रस्ताव स्वीकारला असता तर बरं झालं असतं. देशात कोरोना स्थिती बिकट होत चालली आहे. यामुळे कोरोनाविरोधी लढाईची सूत्रे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हातात द्यायला हवी, असा प्रस्ताव मी दिला होता. हा प्रस्ताव स्वीकारला असता तर आज कोरोनाची स्थिती सरकारच्या चौकटीत राहिली असती. पण आता देशातील कोरोनाच्या स्थितीवर सुप्रीम कोर्टाने समिती नेमली आहे. सॉलिसिटर जनरल कोर्टाला शरण गेले आहेत. आधी गृहमंत्रालय आदेश देत होते. आता सरकारला सुप्रीम कोर्टाचे ऐवकावे लागणार आहे. लोकशाही देशात हा एक प्रकारे सरकारचा पराभव आहे, अशी गंभीर टीका करत सुब्रमण्यन स्वामींनी केंद्र सरकारला पुन्हा घरचा आहेर दिला होता.

धक्कादायक ! बीलावरुन ‘कोरोना’मुक्त महिलेला पती आणि मुलीकडून मारहाण, चाकूनं केला हल्ला, FIR दाखल

चीन, कोरोना व्यवस्थापन आणि अर्थव्यवस्था आदी विषयावर यापूर्वीही स्वामींनी आपली मते स्पष्टपणे मांडली आहेत. स्वामींच्या या अर्थव्यवस्थेसंदर्भातील ट्विटवर अनेक लोकांनी कमेन्ट केल्या आहेत. उदयन मजूमदार नावाच्या एका युझरने (@yudi15) म्हटले आहे, “आपल्याला अर्थमंत्री बनवायला हवे होते. मला वाटते, की या सरकारला आपल्या सारख्या विद्वानांची ॲलर्जी आहे. जे खरोखरच परिवर्तन करू शकतात.” तर एका युझरने (@seas_master) म्हटले आहे, “आपल्यासाठी सन्मानाने सेवानिवृत्त होण्याची वेळ आली आहे.”

READ ALSO THIS :

खुशखबर ! 18 ते 40 वर्षे वयोगटातील 10 वी पास उमेदवारांना पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखतीविना 2428 पदांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

 

2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती

 

सकाळी उठल्यानंतर दररोज बडीशेपचे पाणी प्या, नक्की वजन होईल कमी; जाणून घ्या पाणी पिण्याची पध्दत