‘घरात टोपी बाहेर टिळा, हाच राहुल गांधींचा खरा चेहरा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – घरात टोपी आणि रस्त्यावर टिळा लावला जात आहे. एकीकडे धर्मनिरपेक्षतेबाबत बोलायचे आणि दुसरीकडे जातीयवाद निर्माण करायचा. ग्रँड ओल्ड पार्टी असलेल्या काँग्रेसची ही ब्रँड न्यू ओळख बनली आहे. सध्या या पक्षाची स्थिती अशी आहे की, ना त्यांना माया मिळाली ना राम, अशी टीका केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मंदिर जाण्यावरुन अप्रत्यक्षरित्या त्यांनी ही टीका केली आहे.

राहुल गांधी हे सोमवारी पुष्कर येथील ब्रह्म मंदिरात गेले होते. तिथे त्यांनी विधिवत पुजा केली. ब्रह्म मंदिरात जाण्यापूर्वी राहुल गांधी यांनी अजमेरमध्ये १३ व्या शतकातील सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दग्र्यात जियारतही केली होती. यावरूनच भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी टीका केली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राहुल गांधी यांच्या मंदिर जाण्यावरुन प्रश्न उपस्थित केले होते. गुजरातमध्ये राहुल गांधी हे अनेक मंदिरात गेले होते. जेव्हा ते मंदिरात दर्शनासाठी गुडघ्यावर बसले, तेव्हा ही मशीद नव्हे मंदिर आहे, असे पुजारींना सांगावे लागल्याचे योगी आदित्यनाथ यांनी मध्य प्रदेशमधील धार येथील निवडणूक प्रचारसभेत बोलताना सांगितले होते.
नेत्यांची उंची कमी होताच, पुतळ्यांची उंची वाढविली : फुटाणे

नागपूर : नेत्यांची पत घसरल्यामुळेच, आपला खुजेपणा लपविण्यासाठी पुतळ्यांची उंची वाढविल्याची टीका जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी केली.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नागपूर विभागीय केंद्राच्या वतीने श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शैलक्या व काव्यात्मक शैलीत वर्तमान सरकारचा समाचार घेतला.

या कार्यक्रमात आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेचे संयोजक डॉ. सतीश गोगुलवार व डॉ. शुभदा देशमुख-गोगुलवार यांना लेखक व समीक्षक डॉ. कुमार शास्त्री यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रतिष्ठानचे डॉ. गिरीश गांधी, सामाजिक कार्यकत्र्या डॉ. सीमा साखरे, प्रेम लुनावत, रमेश बोरकुटे व गणेश चव्हाण उपस्थित होते. गडचिरोलीसारख्या आदिवासी भागात ग्रामसभा व्हाव्यात, त्यांचे प्रश्न त्यांनाच सोडविता यावे, असे तीस, पस्तीस वर्षांपूर्वी स्वप्न पाहिले होते. ते आज पूर्ण होताना दिसत असल्याचे डॉ. सतीश गोगुलवार यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. प्रास्ताविक रमेश बोरकुटे यांनी, संचालन डॉ. रेखा दंडिगे-घिया यांनी केले. तर मो. सलिम यांनी आभार मानले.