मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामुळेच पश्‍चिम बंगालमध्ये वाढतोय हिंसाचार : भाजप नेते मुकूल रॉय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये भाजप टीएमसीच्या वादातून रोज हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. यावर केंद्र सरकारने मध्यस्थी करावी अशी स्थानिक भाजपची मागणी आहे. भाजप नेता मुकूल रॉय यांनी संदेशखली येथे झालेल्या हिंसेत तीन लोकांचा मृत्यू झाल्यानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना लक्ष केले आहे. त्यांनी थेट ममतांवर आरोप लावत त्या आपल्या भाषणातून भगवा दलच्या समर्थकांवर हल्ले करण्यासाठी लोकांना उकसवत आहेत.

भाजप नेत्यांनी बशीरहाट मधील भंगीपाडा या गावात येऊन हिंसेत बळी गेलेल्या प्रदीप मंडल आणि सुकांत मंडल यांच्या परिवाराची भेट घेतली. त्यांनी सांगितले की पक्ष विंनती करत आहेत की अमित शाहांनी पीडितांच्या कुटूंबांना सहाय्य करावे.

ममता बॅनर्जींच्या सूचनामुळे आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात येत नाही –

रॉय यांनी आरोप केला की, जर घडणाऱ्या हिंसेला कोणी जबाबदार असेल तर त्या ममता बॅनर्जी आहेत, त्यांच्या सूचनांनुसारच या हत्येतील संबंधितांवर गु्न्हा दाखल करण्यात आला नाही. त्यांनी दावा केला की प्रदीप आणि सुकांत दुपारी आपल्या घरात जोपत असताना, तृणमूलच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या घरात घुसून त्यांना बाहेर घेऊन गेले आणि त्यांची हत्या केली.

तृणमूलकडून देखील आपल्या कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचा भाजपवर आरोप –

उत्तर 24 परगनामधील संदेशखली मध्ये तृणमूल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसा झाली होती, यात 3 लोकांना जीव गमवाला लगाला होता. यात मारल्या गेलेला तिसरा व्यक्ती कयूम मुल्ला हा तृणमूलचा कार्यकर्त असल्याचा दावा तृणमूलने केला आहे. यात आपल्या कार्यकर्त्यांची हत्या केलाचा आरोप तृणमूल कडून करण्यात आला आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

पायांच्या पंजावरून ओळखा तुम्ही किती ‘निरोगी’

डायबिटीज नियंत्रितणात ठेवायचाय ? करा ‘हे’ रामबाण उपाय

हस्त मुद्रांचे अनेक फायदे ; थायरॉइड, अ‍ॅसिडिटी सारख्या समस्या होतील दूर