नामदेव राऊत यांची तलवार ‘म्यान’, विखेंच्या यशस्वी ‘मध्यस्थी’मुळे पालकमंत्री शिंदेंना ‘दिलासा’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पालकमंत्री राम शिंदे यांच्याविरोधात कर्जत-जामखेड मतदारसंघातून बंडखोरी करण्याच्या तयारीत असलेले भाजपचे नामदेव राऊत यांनी त्यांची तलवार म्यान केली आहे. खासदार सुजय विखे यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच इतर स्थानिक नेतेही भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.

महासंग्राम युवा मंच या मेळाव्यात बोलताना नामदेव राऊत म्हणाले की, भाजप उमेदवार पाडण्याचे पाप मला करायचे नाही. आपली ताकद यावेळी दाखवून देऊ, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र, खा. सुजय विखे यांनी मध्यस्थी करीत आपला मान ठेवण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे आपण भाजपात काम करणार आहोत.

खा. विखे म्हणाले की, कुणाला पाडता आले पाहिजे. कुणाला निवडून आणता आले पाहिजे. निवडून आणण्यापेक्षा पाडण्यात मजा असते. गुरुवारी नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून आपण खास शब्द घेतला असून विधानसभेनंतर वर्ष-दीड वर्षात राऊत हे राज्यात ओबीसींचे नेतृत्व करतील.

Visit – policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like