नारायण राणेंचा ठाकरे सरकारला इशारा, म्हणाले – ‘…अन्यथा आम्ही आंदोलन करू’

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – तौक्ते चक्रीवादळाचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला आहे. येथील फळबागा, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अजूनही काही गावे अंधारात आहेत. त्यामुळे अनेक राजकीय मंडळींनी या भागात पाहणी दौरा सुरु केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही वादळग्रस्त भागांचा दौरा केला होता. त्यानंतर शुक्रवारी भाजप खासदार नारायण राणे Narayan Rane यांनी देवबाग येथील वादळग्रस्त भागांची पाहणी करुन ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आमदार वैभव नाईक यांचावर निशाणा साधत नुकसानग्रस्तांना मदत न मिळाल्यास आंदोलन करू असा इशारा सरकारला दिला.

मासिक पाळीदरम्यान कोरोना व्हॅक्सीन घेणे किती सुरक्षित ? जाणून घ्या एक्सपर्टकडून

नारायण राणे Narayan Rane म्हणाले, तौक्ते चक्रीवादळामुळं मालवणमध्ये मोठं नुकसान झालं असताना येथील आमदार, खासदार काय करतात ? केवळ भाजप मदत करत आहे. ज्यांना विधानसभेत दोन शब्द येत नाही त्या वैभव नाईकांना जनतेने कणकवलीच्या बाजारात पाठवण्याऐवजी विधानसभेत पाठवले. आता त्यांना उघडे पडल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी टीका केली. तसेच राज्य शासनाने वादळग्रस्तांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा आम्ही आंदोलन करू,’ असा इशारा राणे यांनी दिला आहे.

दरम्यान, काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत एकमेकांना भेटले होते. त्यामुळे राजकारणात खळबळ माजली होती. या भेटी संदर्भात बोलताना राणे म्हणाले, राजकारणी कोणालाही भेटू शकतात. उद्या मुख्यमंत्री समोर आले तर मी त्यांना नमस्कार करणार. दोन राजकारणी समोर आले तर बोलूच शकतात. राजकारणात कोणाचीही दुश्मनी नाही.असे स्पष्ट करतानाच त्यांनी वैचारीक दुश्मनी असू शकते असंही नारायण राणेंनी सांगितलं.

Also Read This : 

‘या’ ९ पदार्थांनीसुद्धा दूर करा कॅल्शियमची कमतरता, जाणून घ्या

 

पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !

TATA ग्रुपने बिग बास्केटमध्ये खरेदी केली मोठी भागीदारी, Amazon आणि Flipkart ला मिळणार ‘टक्कर’

Aadhaar कार्ड Lock करण्याची सोपी पद्धत, असे करा लॉक; तुमची माहिती राहिल सुरक्षित, जाणून घ्या

 

जुन्या नावाने नवीन औषधे विकण्यास केंद्राची बंदी