नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर ‘हल्लाबोल’, म्हणाले – ‘TV वर सुरू असणाऱ्या जाहिराती बघून लोक शिव्या घालताहेत’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावरून मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्याचा अर्थसंकल्प हा फक्त पुण्याभोवती केंद्रीत महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक अर्थसंकल्प आहे. टीव्हीवर सुरू असणाऱ्या जाहिराती बघा या जाहिराती बघून लोक शिव्या घालत आहेत, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी यावर भाष्य करत प्रतिक्रिया दिली.

‘सरकारनं फक्त घोषणा केल्यात, एकही तरतूद केलेली नाही’

नारायण राणे म्हणाले, राज्याचा अर्थसंकल्प हा फक्त पुण्याभोवती केंद्रीत महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक अर्थसंकल्प आहे. राज्याच्या उत्पन्नात प्रचंड मोठी तूट आहे. अजूनही कोरोना संपलेला नाही. अजूनही उत्पन्न कमीच येणार असं वाटत असताना अर्थसंकल्पात दावा केला तेवढे पैसे कुठून येणार आहेत. दीड लाख कोटी उत्पन्न कमी असताना एवढ्या गोष्टींसाठी पैसे कुठून आणणार. सरकारनं फक्त घोषणा केल्यात, एकही तरतूद केलेली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

कोकणाच्या कोणत्या योजनेला पैसा दिला ?

अर्थमंत्र्यांनी हा बजेट फोडला आहे. कोकणाच्या कोणत्या योजनेला पैसा दिला. कोकणाला काहीच दिलं नाही. आमच्या इकडे चक्रीवादळाला एक रुपयाही आला नाही. टीव्हीवर सुरू असणाऱ्या जाहिराती बघा. या जाहिरात बघून लोक शिव्या घालत आहेत. त्यांनी 3 महिने दिलेत. परंतु मी तर म्हणतो की, हे सरकार एकही दिवस राहू नये, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.