नारायण राणेंचा उध्दव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांचं दसरा मेळाव्याचं भाषण म्हणजे निर्बुध्द बरळणं’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात केलेलं भाषण (Cm Uddhav Thackeray Speech Of Dusshera Melava) म्हणजे निर्बुद्ध बरळण होते अशी खोचक टीका भाजपा खासदार नारायण राणे ( Bjp Leader Narayan Rane) यांनी केली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, कोणत्याही योजना, करोनाचं संकट याबाबत काहीही भाष्य ठाकरे यांनी केले नाही. मुख्यमंत्र्यांना काय बोलावे, कसे बोलावे हे अजून कळत नाही. मुख्यमंत्री पदासाठी हा माणूस लायकच नाही असे राणे यांनी म्हटले आहे. तससेच करोनामुळे महाराष्ट्रात 43 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याला जबाबदार कोण असाही प्रश्न राणे यांनी विचारला आहे.

राणे म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरेंनी केलेले भाषण शिवराळ होती. एका मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. वाघाची भाषा करणारा हा शेळपट माणूस आहे. महाराष्ट्राशी बेईमानी करुन हा माणूस मुख्यमंत्री झाला. 56 जागा मिळाल्या तरीही मुख्यमंत्री झालात कारण सेक्युलर पक्षांशी हातमिळवणी केली. मोदींचं नाव घेऊन निवडणूक जिंकली. सुशांतप्रकरणी स्वतःच्या मुलाला क्लिन चीट दिली. मात्र सुशांतने आत्महत्या केलेली नाही. सुशांतचा खूनच झाला आहे. याप्रकरणी एक दिवस आदित्य ठाकरे तुरुंगात जाणार आहे. मला आणि माझ्या मुलांना बेडुक म्हणतो हा माणूस? हा माणूस पुळचट आहे. मी 39 वर्षे शिवसेनेत होतो, आमच्यासारख्या शिवसैनिकांनी त्यावेळी शिवसेना उभी केली. केसेस आम्ही अंगावर घेतल्या, स्वतःला वाघ म्हणवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी कुणाला कानाखाली तरी दिली आहे का असे ते म्हणाले.

You might also like