काय सांगता ! होय, चक्क काँग्रेस-राष्ट्रवादी अन् शिवसेनेची माफी मागत भाजप नेत्याचा राजीनामा

मिरा भाईंदर : पोलीसनामा ऑनलाइन – मिरा भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. आपल्या पदाचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेचीही माफी मागितली आहे. सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर भाजप महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. तर दुसरीकडे भाजपमधील अंतर्गत कलहही समोर येत आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2973352872741469&id=100002003561895

मिरा भाईंदर मतदारसंघातील माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी आपण राजीनामा देत असल्याची घोषणा केली. फेसबुकवर एक पोस्ट करून नरेंद्र मेहता यांनी केली आहे. यामध्ये त्यांनी आता या क्षणापासून मी भाजपच्या सर्व पदांचा आणि जबाबदाऱ्यांचा राजीनामा देतोय. मी हृदयापासून सर्वांचे धन्यवाद मानतो ज्यांनी मला नेहमी मदत केली आहे, माझ्या सोबत राहिले आहेत, असे म्हणत त्यांनी आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे.

राजीनामा देताना नरेंद्र मेहता यानी, मी भाजपच्या सर्व वरीष्ठ पदाधिकाऱ्यांची आणि तसंच महाराष्ट्रातील तसेच मिरा भाईंदर मधील सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांची माफी मागतो. विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मेहता पराभूत झाले होते. गीता जैन यांनी नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता.