‘जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार ?, भाजप नेत्याची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे भोसले यांना टोला लगावला आहे. याच मुद्द्यावरून भाजप नेते निलेश राणे यांच्याकडून शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. भाजपकडून ‘उदयनराजे व संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. त्यामुळे ते भाजपचीच भाषा बोलणार असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते.

मराठा आरक्षणाबाबत दोन्ही राजांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. या वरून शरद पवार यांनी त्यांना टोला लगावला आहे. भाजप नेते निलेश राणे यांच्याकडून मात्र शरद पवार यांच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शरद पवार यांनी असे वक्तव्य करणे म्हणजे आश्चर्य आहे.जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार ? या वक्तव्यावरून मराठा समाजाला एवढं कळलं पवार साहेबांकडून आणि महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणासाठी योग्य काम होणार नाही,’ असे निलेश राणे यांनी ट्विट करून सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला देण्यात आलेल्या स्थागितीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलाच तापलं. या वरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काही दिवसांपूर्वी भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर जातनिहाय आरक्षण रद्द करा अशी भूमिका घेण्यात आली होती. तसेच मराठा समाज आता एकटा नाही, एवढंच सांगतो. मी सोबत आहे, असंही उदयनराजे म्हणले होते. तसेच सरकार दखल घेत नसेल लढावंच लागेल, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून देण्यात आला आहे.