‘आरोप ठाकरे कुटुंबीयांवर, उत्तर देतंय नाईक कुटुंब, फारच जवळचे संबंध दिसतात…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक प्रकरणात अटक करण्यात आली. दरम्यान, भाजपाकडून राज्य सरकारला घेराव घातला आहे. सध्या भाजपने आक्रमक पावित्रा घेतला आहे. या पार्शवभूमीवर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी अन्वय नाईक कुटुंबात जमिनीचे २१ व्यवहार झाल्याचा दावा केला होता. यानंतर अन्वय नाईक कुटुंबीयांनी यासंबंधी खुलासा केला होता. “याच्यात गुपीत असं काहीच नाही. त्यांनी आमच्याकडून जागा विकत घेतली आणि आम्ही ती दिली,” असं अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी सांगितलं होतं.

भाजपा नेते नीलेश राणे यांचं ट्विट
नाईक कुटुंबाला इतकी मिरची लागली की आरोप झालेत ठाकरे कुटुंबावर आणि उत्तर देतायत नाईक कुटुंब. मोठा झोलझाल दिसतोय. फारच जवळचे संबंध दिसतायत,” असं म्हणत नीलेश राणे यांनी ठाकरे आणि नाईक कुटुंबीयांवर निशाणा साधला.

Advt.

काय म्हणालं होतं नाईक कुटुंब ?
“मला बऱ्याच लोकांकडून कळलं असून व्हिडीओदेखील पाहिला आहे. पण याच्यात गुपीत असं काहीच नाही. त्यांनी आमच्याकडून जागा विकत घेतली आणि आम्ही ती दिली. किरीट सोमय्या जे सातबारे दाखवत आहेत ती खुली कागदपत्रं असतात. महाभूमीच्या वेबसाइटवर गेलात तरी तुम्हाला ती मिळतील. त्यामुळे ही अशी खुली कागदपत्रं जाहीर केल्याबद्दल मी किरीट सोमय्यांचे आभार मानते. जमीन कोणी विकत देऊ शकत नाही का? हा योग्य मार्गाने झालेला व्यवहार आहे. यामध्ये किरीट सोमय्यांना आता का समस्या जाणवत आहे. त्याचा आत्महत्येच्या प्रकरणाशी काय संबंध आहे. किरीट सोमय्या नेमकं काय दाखवू इच्छित आहेत?, किरीट सोमय्या यांना काही मदत हवी असेल तर मी स्वत: हजर होईल, तुम्ही कधीही बोलवा. ”

किरीट सोमय्या आधी झोपले होते काय ? आज्ञा नाईक यांची टीका
किरीट सोमय्या आधी झोपले होते. पण, अर्णब गोस्वामीला अटक झाल्यानंतर जागे झाले आहेत,” अशी टीका आज्ञा नाईक यांनी केली. “लोक कित्येक वस्तू विकत घेतात. या वस्तूंशी हा संबंध नाही. माझ्या घरातील दोन माणसं गेली आहेत. किरीट सोमय्यांनी जमिनीच्या व्यवहाराशी त्याची तुलना करु नये. एक आई आणि तिचा मुलगा गेला आहे. त्याचा राजकारणाशी संबंध जोडू नका.आवाज बंद होण्यास वेळ लागणार नाही,” असा इशारा अक्षता नाईक यांनी यावेळी किरीट सोमय्या यांना दिला. किरीट सोमय्या यांना राजकारण करायचं असेल तर ते काहीही मुद्दे आणू शकतात. पण हे आत्ता आणण्यामागचं काय प्रयोजन आहे हे मलाच विचारायचं आहे? गुन्हेगार अर्णब गोस्वामीला पाठीशी का घालताय?,” अशी विचारणा आज्ञा नाईक यांनी केली. तर दुसरीकडे अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी ५ मे २०१८ ला जेव्हा आम्ही अग्नी दिला तेव्हा किरीट सोमय्या कुठे गेले होते? त्यांची बोबडी वळली होती का? अशी विचारणा केली.