‘पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित दादा पवारांनीच केला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न काही आयपीएस अधिकाऱ्यांकडून करण्यात आले होते,असे विधान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून करण्यात आले होते. या विधानानंतर अनिल देशमुख यांच्याकडून सारवासारव करण्यात आली आहे. भल्या पहाटे शपथ घेतलेल्या फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करता यावे म्हणून काही अधिकारी प्रयत्न करत होते, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्याकडे सुपूर्द करत होते, असा दावा आज सामना या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या दाव्यावर भाजपचे नेते निलेश राणे यांच्याकडून निशाणा साधण्यात आला आहे. निलेश राणे यांच्याकडून करण्यात आलेल्या ट्विट मध्ये म्हणले आहे कि, शिवसेना नेहमी पहाटेच्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात झालेल्या शपथविधीवर टीका करते. परंतु उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पहाटे पहाटे काय राज्यपालांच्या बंगल्यावर काय मॉर्निगवॉक साठी आले होते का ? असा सवाल निलेश राणे यांच्याकडून करण्यात आला होता. तसेच त्यावेळी अजित पवार यांच्याकडे आमदार टिकले नाहीत म्हणून ते परत गेले असे निलेश राणे यांनी म्हणले आहे. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा खरा गेम कोणी केला असेल तर तो अजित पवार यांनी केला असा दावा निलेश राणे यांच्याकडून करण्यात येत आहे.

सामनाच्या अग्रलेखात सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करणारे अधिकारी कोण यापेक्षा काही झाले तरी भाजपाचे सरकार बनले पाहिजे असे मानणारे सहानुभूतीदार कोण ते महत्वाचे आहे. पहाटे पहाटे सरकार स्थापन करण्याच्या कटात काही अधिकाऱ्यांचा समावेश असायलाच हवा. हे सर्व नाट्य वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर घडले. काही पोलीस अधिकारी मुख्यमंत्राच्या मर्जीत राहण्यासाठी लहान पक्षांच्या आणि अपक्ष आमदारानां आपल्या जाळ्यात ओढत होते, असा दावा करण्यात आला आहे. तसेच आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्याकडे सुपूर्द करत होते, गुप्तचर खात्याने सुद्धा याबाबत महत्वाची कामगिरी केली आहे. बहुमत सिद्ध करायची जबाबदारी आपल्या खांदयावर घेऊन राबत होते. मात्र तरीपण फडणवीस सरकार कोसळले आणि महाविकास आघाडीचे सरकार यायचे ते आलेच असं सामनाच्या अग्रलेखातून सांगण्यात आले आहे. सहानुभूती अधिकारी मंडळाच्या भरोशावर कोणी सरकार पाडण्याचे मनसुबे पाहत असतील तर तो वेडेपणा ठरेल यामधील काही अधिकारी आजही मोठ्या पदावर कार्यरत आहे. ठाकरे सरकार येऊ नये म्हणून उघड प्रयत्न करूनही आपले कोणी काय वाकडे केले या थाटात त्यांचा वावर असतो. सरकारला खरा धोका याच प्रवृत्तीच्या माणसांकडून असतो. अशा प्रवृत्तीवर लक्ष ठेवणे गृहखात्याचे काम आहे. त्यांनी ते उत्तम पद्धतीने पार पाडले तर सरकारचे भवितव्य उत्तम आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख

४ ते ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सरकार पाडण्याचा करण्यात आला.त्यामध्ये एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश आहे. आमदारानां धमकावणे, तुम्ही राजीनामा द्या असे सांगणे असे विधाने करणे असे अनेक प्रकार घडले आहेत. त्यानंतर स्वतः शरद पवार यांनी या मध्ये लक्ष घातले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्यात चर्चा झाली आणि हे प्रकरण मार्गी लावण्यात आले असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

त्या पहाटे नेमकं काय घडलं

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेन भाजप सोबत असलेली युती तोडली. यानंतर शिवसेनेकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन करण्यासाठी हालचाल करण्यात आली. मात्र ही चर्चा सुरु असताना एका रात्रीत हालचाली करून भल्या पहाटे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यामंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यामंत्री म्हणून शपथ घेतली त्यामुळे राजकीय उलथापालथ झाली होती. मात्र फडणवीस सरकारकडे बहुमत नसल्याने हे सरकार फक्त ७८ तासच टिकलं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like