निलेश राणेंची संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंवर ‘खरमरीत’ टीका, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राजधानी दिल्लीमधील जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’वर अनेक संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, या आंदोलनादरम्यान एका तरुणीने हातामध्ये ‘फ्री काश्मीर’चे पोस्टर धरल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. या पोस्टरवरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडीओ शेअर करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले होते. यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला होता. आंदोलन नेमके कशासाठी ? काश्मीर मुक्तीची घोषणा कशाला ? मुंबईमध्ये आशाप्रकारे फुटीरतावादी खपवून का घ्यायचे. उद्धव ठाकरे, तुमच्या नाकाखाली टिच्चून मुक्त काश्मीरचा भारतविरोधी राग आवळला जातोय तो खपवून घेणार का, असा सवाल त्यांनी केला होता.

यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी, फ्री काश्मीरचा अर्थ काश्मीरची निर्बंधामधून मुक्तता करा असा आहे. तसेच काश्मीरमधील इंटरनेट, मोबाईल सेवा बंद करण्याच्या निर्बंधामधून काश्मीरला मुक्त करा, अशा मागणी आंदोलक तरुणीने पोस्टद्वारे करत असल्याचे राऊत यांनी म्हटले. तसेच मंत्री अदित्य ठाकरे यांनी देखील पोस्टर झळकवणाऱ्या मुलीचा उद्देश नेमका काय होता हे समजावून घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले होते.

संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या फ्री काश्मीरच्या पोस्टरवरच्या विधानावरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, “Free Kashmir चा अर्थ शिवसेनेच्या संज्या राऊत आणि बारक्या आदित्यला Free Internet वाटला. लोकांना मूर्ख समजता ??? सरळ सांगून टाका सध्या आम्ही काँग्रेसवाल्यांची आणि पवारांची भांडी घासत आहोत म्हणून फ्री काश्मीरचा अर्थ आम्हाला विचारू नका. अख्या भारताला Free Kashmir चा अर्थ कळतो”. असे म्हणत संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/