‘झेंडा माघे मग सल्यूट कोणाला मारतायत मुख्यमंत्री… समोर CBI दिसली की काय ???’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा या शासकीय बंगल्यावर ध्वजारोहण केले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच ध्वजारोहण सोहळा होता. यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या देखील उपस्थित होत्या. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या ध्वजारोहणाच्या फोटोवरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी खोचक टोला लगावला आहे.

निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो ट्विट करून त्यांना टोला लगावला आहे. निलेश राणे यांनी वर्षा बंगल्यावर झालेल्या ध्वजारोहणाचा फोटो शेअर केला आहे. तसेच फोटो शेअर करुन झेंडा मागे आहे मग मुख्यमंत्री सॅल्युट कोणाला मारतायं असला प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे समोर सीबीआय दिली की काय, असं म्हणत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

दरम्यान, आरोग्य या विषयाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार असून राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सुविधा पोहोचण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मंत्रालयात ध्वजारोहण केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 150 टेस्टिंग लॅब सरु करण्यात आल्या आहेत. राज्या विविध ठिकाणी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.