निलेश राणेंचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीकास्त्र, म्हणाले…

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला आहे. त्यामुळे मराठा समाज (maratha community ) आक्रमक झाला आहे. त्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या (maratha community ) भावना जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा केला. दरम्यान गुरुवारी (दि.27) खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)  यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 13 मिनिटं चर्चा झाली. मराठा आरक्षण (Maratha reservation) प्रश्नी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे पवारांना सांगितल्याचे संभाजीराजे म्हणाले. तसेच उद्या मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती संभाजीराजे (MP Sambhaji Raje)  यांनी दिली.

संभाजीराजेंच्या या भेटीनंतर भाजपाचे नेते माजी खासदार निलेश राणे (Former MP Nilesh Rane)  यांनी एक ट्विट केले आहे. संभाजीराजेंच्या मनात काय भलंतच दिसत आहे. पवार साहेब व महाविकास आघाडी सरकारच्याजवळ जायच असेल, तर खुशाल जाव, पण मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही, असे राणे यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर रस्त्यावर येऊन मोर्चा, आंदोलन करण्याचा इशारा काही मराठा संघटनांनी दिला आहे. परंतु सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता आंदोलन, मोर्चे टाळण्याचे आवाहन संभाजीराजेंनी केल आहे. त्यामुळेच संभाजीराजे राज्यभर दौरा करुन मराठा समाजाची म्हणण त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर आज त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन परिस्थिती मांडली आहे.

 

Also Read this : 

 

ठाकरे सरकारकडून उजनीच्या पाण्याचा आदेश रद्द !

 

Immune Weakening Foods : तुम्ही तुमची इम्युनिटी कमजोर तर करत नाही ना? जाणून घ्या असे 4 फूड्स ज्यामुळे आजारी पडू शकता
CBSE 12th Exam : 30 मिनिटांची असेल परीक्षा, एक जूनला केंद्रीय शिक्षणमंत्री सांगणार तारीख !

 

Good News : ब्लॅक फंगसच्या संसर्गावर उपचारासाठी ‘या’ कंपनीनं बनवलं इंजेक्शन, 1200 रूपये असेल किंमत, जाणून घ्या

 

CM च्या भेटीमुळे राष्ट्रवादीत हालचालींना वेग ! अजितदादा, जयंत पाटील पोहोचले शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण

 

Cocktail Drug in India : आजपासून मिळू शकते कॉकटेल ड्रग, केवळ एक डोसने होईल कोविडचा उपचार, जाणून घ्या किंमत