भाजप नेत्याची CM ठाकरेंवर टीका, म्हणाले – ‘2 वर्षात सर्व वाईटच होतयं’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   तौक्ते चक्रीवादळाचा गोव्यासह कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला आहे. शनिवारी रात्रीपासून मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांत वादळी वा-यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या वादळाचा प्रभाव लक्षात घेत आज मुंबईसह ठाणे, पालघर या 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी या वादळाशी मुकाबला करण्यासाठी सज्ज होताना भाजप नेते राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ठाकरे सरकारच्या 2 वर्षांच्या कार्यकाळात चक्री वादळ. तसेच कोरोना मृतांच्या संख्येत देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, अजूनही वाईट गोष्टी सुरूच आहेत. सर्व वाईटच होतय अशी टीका राणे यांनी केली आहे.

दरम्यान सत्ताधारी नेत्यांच्या PR वरूनही आमदार राणे यांनीही थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप लावले होते. राज्यातील कोरोनाची गंभीर परिस्थिती लपवण्यासाठी बॉलिवूड कलाकारांकडून ट्विट केले जाते. यासाठी शिवसेना भवनातून अनेक कलाकारांना फोन केले जातात असा आरोप राणेंनी केला आहे. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर मुंबईतील परिस्थिती बिकट झाली होती. मात्र, महापालिकेकडून तातडीने उपाययोजना केल्या गेल्या. रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरसंदर्भात समन्वय प्रणाली विकसित करण्यावर भर दिला आहे. मुंबईच्या ऑक्सिजन वितरण प्रणालीचे सर्वोच्च न्यायालयानेही कौतुक केले. मात्र, देशभरात नावाजलेले ठाकरे सरकारचे मुंबई मॉडेल हा निव्वळ खोटारडेपणा असल्याचा आरोप राणे यांनी केला होता.