खा. राऊतांच्या नातेवाईकांना ईडीच्या नोटीसा, भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई सुरू असताना याच प्रकरणात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याही नातेवाईकांना ईडीकडून नोटिसा पाठवण्यात (shiv-sena-leader-sanjay-raut-also-received-ed-notices) आल्याचा खळबळजनक दावा भाजपचे नेते नितेश राणे (bjp-leader-nitesh-rane) यांनी केला आहे. राणेंच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत. राणे यांच्या विधानाला खा. राऊत आता काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राणे यांनी शनिवारी हिंगोलीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. खा. राऊत नातेवाईकांना नोटिसा मिळाल्यामुळेच जास्त फडफड करत आहेत. तसेच, ईडीच्या कारवाईमुळेच ते माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले नव्हते ना?,अशीही मला शंका असल्याचे राणे यांनी म्हटले आहे.

शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे
कितीही प्रयत्न केला तरी हे महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. तुम्ही सुरुवात केली असेत तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. आमच्या मंत्री, आमदारांच्या घराबाहेर ईडीने कार्यालय थाटली, तरीही आम्ही घाबरत नाहीत. ईडी एखाद्या राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणे काम करीत असल्याची टीकाही खा. राऊत यांनी केली आहे.

क्वारंटाईन झाल्यानंतर हजर राहा
सध्या मी कोविड-19 नियमानुसार क्वारंटाईन आहे. त्यामुळे मला ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नाही. तसेच माझा मुलगा विहंग सरनाईक यांची पत्नीही आजारी आहेत. त्यामुळे दोघांचीही पुढच्या आठवड्यात चौकशी करावी, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी ईडीकडे केली होती. प्रताप सरनाईकांच्या या विनंतीनंतर ‘क्वारंटाईन झाल्यानंतर हजर राहा, असा आदेश प्रताप सरनाईकांना ईडीकडून दिला आहे.