पंतप्रधानपद लांब राहिलं, आधी मुंबईचा पुढचा महापौर शिवसेनेचा करू दाखवा !

मुंबई : पोलसीनामा ऑनालाइन –  राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 54 व्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही बनवणार असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला असल्याचे सांगितले. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या या विधानावर भाजपचे नेते नितेश राणे यांनी टोला लगावला आहे.

पहिले पुढचा शिवसेनेचा मुंबईचा महापौर बसवा, पंतप्रधान तर लांबच राहिले, असं ट्विट नितेश राणे यांनी करून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. आता नितेश राणे यांच्या ट्विटला शिवसेना कशा प्रकारे प्रतिउत्तर देते हे पहावे लागेल.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकाला पंतप्रधान बनवण्याचा निर्धार केल्यानंतर संजय राऊत यांनी देखील भविष्यात भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून आता पाहतो आहे. आता फक्त राज्याचे नाही तर देशाचे नेतृत्व करायची वेळ आली आहे, असे मत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

तत्पूर्वी, अन्याय सहन करू नका आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. आपल्यासोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला तो आपण मोडीत काढला. त्यामुळे मी आज येथे मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला.