BJP Leader On Thackeray Government | ‘अनेक आमदार मुख्यमंत्री ठाकरेंवर नाराज; 20 जूनला दिसेल देवेंद्र फडणवीसांचा चमत्कार’; भाजप नेत्याचा दावा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – BJP Leader On Thackeray Government | राज्यसभा निवडणूकीच्या निकालात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) चांगलीच चर्चा रंगली. अपक्षांना आपल्या बाजूने करण्याची रणनीती यशस्वी ठरल्याने भाजपचा (BJP) तिसरा उमेदवार विजयी झाला. आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही (Maharashtra MLC Election-2022) अशी रणनीती यशस्वी होईल का? याची चर्चा चांगलीच रंगताना दिसत आहे. अशातच भाजपचे नेते परिणय फुके (BJP Leader Parinay Fuke) यांनी सूचक विधान केलं आहे. ‘राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीतही भाजपचा चमत्कार दिसेल. भाजपचे सर्व उमेदवार निवडून येतील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (BJP Leader On Thackeray Government)

 

‘अपक्ष आणि इतर पक्षांचे आमदार भाजपच्या संपर्कात,’ असल्याचा दावा परिणय फुके यांनी केला. राज्यसभेच्या निवडणुकीत गुप्त मतदान नव्हतं. मात्र तरीही आमचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. आता विधान परिषद निवडणुकीत तर गुप्त मतदान होणार आहे, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. तसेच, “अपक्ष आणि इतर पक्षांचे आमदार 3 दिवसांपासून भाजपच्या संपर्कात आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे सगळे उमेदवार विजयी होतील, असं अनेकांना वाटत नव्हतं. मात्र चमत्कार घडला. आता 20 जूनला विधान परिषदेच्या निवडणुकीत आणखी एक चमत्कार पाहायला मिळेल. देवेंद्र फडणवीस पुन्हा चमत्कार दाखवतील,” असं ते म्हणाले. (BJP Leader On Thackeray Government)

 

पुढे बोलताना परिणय फुके म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल (CM Uddhav Thackeray) आमदारांच्या मनात नाराजी आहे. 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत हीच नाराजी दिसून येईल. राज्यसभा निवडणुकीत गुप्त मतदान नव्हतं. मात्र विधान परिषदेसाठी गुप्त मतदान होणार आहे. त्यामुळे अनेक नाराज आमदार भाजपच्या बाजूनं मतदान करतील,” असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, विधानपरिषदेच्या 10 व्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत चुरस रंगणार आहे.
ही जागा भाजपने जिंकल्यास अपक्ष आमदार आणि लहान पक्षांवर देवेंद्र फडणवीस यांचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट होईल.
ही बाब मुख्यमंत्री ठाकरे यांच्या प्रतिमेला मारक ठरू शकते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत विधानपरिषद निवडणुकीमध्ये आपण यशस्वी व्हायची तयारी दर्शवली आहे.
त्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

 

Web Title :- BJP Leader On Thackeray Government | MLC election maharashtra vidhan parishad election all five bjp candidates will win says parinay fuke

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rupali Chakankar | ‘मीच तुमच्याकडे तुमच्यावरच्या अश्लील Comment ची तक्रार करतो’; महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना पत्र

 

Maharashtra Crime News | धक्कादायक ! मुलानेच जन्मदात्या वडिलांवर कोयत्याने सपासप वार करून केला खून; परिसरात खळबळ

 

Gopichand Padalkar On Supriya Sule | ओबीसी आरक्षणावर गोपीचंद पडळकरांनी सुप्रिया सुळेंचा व्हिडीओ शेअर करत साधला निशाणा; म्हणाले – ‘एका अर्थी मला आनंद..’