भाजपाचं डॅमेज कंट्रोल ! एकनाथ खडसेंसह ‘हे’ 3 दिग्गज होणार आमदार

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्ता गेल्यानंतर भाजपने डॅमेज कण्ट्रोलसाठी भाजपने जोरदार हलचाली सुरु केल्या आहेत. त्याअंतर्गत भाजपच्या नाराज नेत्यांवर पक्षाकडून मोठ्या जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी भाजपने ऍक्शन प्लॅन आखल्याची माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रकांत बावनकुळे आणि विनोद तावडे यांचे तिकीट कापले. तर पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. त्यानंतर भाजपमध्ये नाराजांचा एक गट तयार झाला. नाराज एकनाथ खडसे यांनी उघडपणे टीका करत पक्ष सोडण्याची भाषा केली. तसेच नाराज नेत्यांनी भाजपच्या राज्य पातळीवरील नेतृत्वाला लक्ष्य केले. त्यानंतर आता भाजपकडून नाराज नेत्यांच्या नाराजीची दखल घेण्यात येत असल्याचे दिसत आहे.

भाजपकडून लवकरच पंकजा मुंडे, एकनाथ खडसे आणि चंद्रकांत बावनकुळे यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांची आहे. त्यामुळे जनाधार असलेले नेते पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. या नेत्यांच्या आधारे भाजप राज्यात आणि विधानपरिषदेत पुन्हा आक्रमक होणार आहे. येत्या सहा महिन्यात एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे हे तिघंही विधानपरिषदेचे आमदार होऊ शकतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/