पंकजा मुंडेंनी देवेंद्र फडणवीसांचे ‘कान’ टोचले, म्हणाल्या…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन  – विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पक्षापासून दूर असणाऱ्या भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी अखेर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी शेवटपर्यंत झटले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पाच वाजेपर्यंत भाजपाचा एकेक आमदार निवडून येईल यासाठी प्रचार केला,’ असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बीडमधील गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमात पंकजांनी आपल्या समर्थकांशी संवाद साधला. सोबतच त्यांनी पक्षासाठी केलेल्या विविध कामांची तसेच कष्टांची आठवण करुन दिली. ‘निवडणुकी आधीच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निश्चित झालेला होता. फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी मी प्रयत्न करत होते. एक-एक आमदार पक्षाला देण्यासाठी वणवण फिरत होते, मी प्रत्येक क्षणी सेवा केली. पराभव झाल्यानंतरही प्रत्येक बैठकीला उपस्थित राहिले. सत्तास्थापनेसाठी जे काही करता येईल ते केलं,’ अश्या शब्दात पंकजा मुंडेंनी पक्षासाठी केलेल्या कष्टाबद्दल संगितलं.

दरम्यान, निवडणुकीनंतर पंकजा मुंडे पक्षावर नाराज आहेत, त्यामुळे त्या पक्षाविरूद्ध बंद करतील, अश्या चर्चांना उधाण आलं होत. यावर,पंकजा म्हणाल्या कि, मी का बंड करेन, मी कुणाविरुद्ध बंड करू ? कितीही झाले तरी आपण पक्ष सोडणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच, पक्ष ही प्रक्रिया असते. पक्षावर कुणाचीही मालकी नसते. अटलजी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि आता अमित शहा यांच्यासारख्यांनी अध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा वाहिली आहे. पक्ष हा कोणाही एका व्यक्तीचा नाही, अशा शब्दांत पंकजांनी भाषण केलं.

तसेच मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. पद मिळवण्यासाठी पंकजा मुंडे दबाव आणत आहेत, अश्या चर्चा आहेत. मला कोणतेही पद मिळू नये, यासाठी अशा चर्चा घडवून आणल्या जात आहे. असंदेखील त्यांनी यावेळी स्पष्ट केल.

‘आपण कमजोर व्हायचं नाही,’ अश्या शब्दात कार्यकर्त्यांना आवाहन करत एक मैं ही हूं, समझी नहीं खुद को आज तक, एक दुनिया ही है, की न जाने मुझे क्या क्या समझ रही है, असा शेर म्हणत पकंजा यांनी राज्यातील सद्यस्थितीवर भाष्य केलं.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/