भाजपा नेत्या पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून पुढे काय करायचं? 12 डिसेंबरला ठरवू असे म्हंटले आहे. तसेच पंकजा मुंडे यांनी ट्विटर बायोही बदलला आहे. गेल्या काही दिवसांत पंकजा यांनी शिवसेनेचे कौतूक करणारे ट्विट केले आहेत. या सर्व घडामोडींमुळे पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार का? अशी अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

पराभव झाल्यानंतर काही क्षणातच माध्यमांसमोर जाऊन मी तो स्वीकारला. आधी देश,नंतर पार्टी आणि शेवटी स्वत:’ हे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेले आहेत

आपण मला वेळ मागत आहात.. मी आपल्याला वेळ देणार आहे…
आठ ते दहा दिवसांनंतर…हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे.

12 डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू !
काल अशी फेसबुक पोस्ट पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर टाकली तर आज ट्विटरवर अकाऊंटवरून भारतीय जनता पक्षाचे नाव हटविले आहे. या गोष्टींमुळे पंकजा मुंडे भाजपाला सोडचिठ्ठी देऊन वेगळा विचार करणार का? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. 28 नोव्हेंबरला पंकजा यांनी शेवटचे ट्विट केले आहे. दिवसभरात त्यांनी केलेले ट्विट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे कौतूक करणारे आहेत. त्यामुळे मुंडे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. पंकजांचे बंधू धनंजय मुंडे यांनी निवडणुकीत बाजी मारली. हा पराभव पंकजा मुंडे यांच्या जिव्हारी लागला आहे. एकनाथ खडसेंपाठोपाठ पंकजा मुंडेही सध्या भाजपात नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे 12 तारखेला गोपीनाथगडावर पंकजा मुंडे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Visit : Policenama.com