परळीतून विजय सोपा नसल्याच्या चर्चेवर पंकजा मुंडेंचे प्रत्युत्तर

परळी : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघामध्ये चुरशीच्या लढती पहायला मिळत आहेत. तर काही ठिकाणी हायहोल्टेज सामना होणार असून या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. यापैकी एक असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत असली तरी खरी लढत मुंडे विरुद्ध मुंडे अशीच होणार आहे. या रंगदार लढतीमध्ये कोण मुंडे बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसं निवडणूक निकालाबाबत तर्क-वितर्क बांधले जात आहेत. त्यातच परळीत यंदाची निवडणूक पंकजा मुंडे यांच्यासाठी अवघड असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, आता याबाबत आज स्वत: पंकजा मुंडे यांनी भाष्य करत पलटवार केला आहे. महाराष्ट्रभर आता परळीत माझं काही खरं नसल्याच्या अफवा पसरत आहेत, असे म्हणत त्यांनी या चर्चांना प्रत्युत्तर दिले आहे.

राज्यातील विधानसभा निवडणूक रंगतदार स्थितीत असलेली पहायला मिळत आहे. निवडणुकीच्या मतदानासाठी मोजकेच काही दिवस बाकी असताना युती आणि आघाडीमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे दिसत आहे. अशातच अनेकांकडून या निवडणुकीच्या निकालाबाबत अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. भाजपचाही एक अंतर्गत सर्व्हे समोर आल्याची माहिती आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी