पंकजा मुंडेंनी समर्थकांना केलं ‘हे’ आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपमध्ये सध्या नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. त्यानंतर काल झालेल्या भाजपच्या बैठकीला पंकजा मुंडे अनुपस्थित राहिल्या. यामुळे तर्क-वितर्कांना आणखी उधाण आले. 12 डिसेंबरला पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. याच कारणाने त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी ट्विट करत आवाहन केले आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्विट केले की 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांना ‘गोपीनाथ गड’ येथे आमंत्रण. तुम्ही सारे या हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे, तुम्ही ही या, वाट पाहते. असे भावनिक आवाहन पंकजा मुंडे यांनी ट्विटमधून केले. पंकजा मुंडे एखादी महत्वाची भूमिका घेऊ शकतात त्यामुळे कार्यकर्ते आणि भाजप नेत्यांचे लक्ष या मेळाव्याकडे लागले आहे.

भाजपकडून औरंगाबादमध्ये विभागीय बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. परंतू या बैठकीला भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे उपस्थित राहिल्या नाहीत. या बैठकीत भाजपकडून मराठवाड्याचा जिल्हावार आढवा घेण्यात आला. जय, पराजय, तक्रारी याबाबात भाजपच्या बैठकीत चिंतन करण्यात आले. बैठकीला भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. परंतू पंकजा मुंडे यांनी मात्र गैरहजर राहणे पसंत केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना बळ मिळाले.

नाथाभाऊ भाजपवर नाराज –

मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपवर नाराज आहेत. ते बंड करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. नाराज नेत्यांसाठी भाजपकडून काही बैठका घेण्यात येत आहेत. परंतू एकनाथ खडसे, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत प्रवेश करु शकतात अशी शक्यता आहे. काल दिल्लीत एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची देखील भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Visit : Policenama.com 

You might also like