भाजपकडून पहिला थेट हल्ला – एकनाथ खडसेंनी स्वतः केलेल्या उद्योगांचा विचार करावा

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ खडसे यांना महाविकास आघाडीत मंत्रिपद मिळावे, फक्त भाजपवर आरोप करण्यासाठी त्यांचा पक्षप्रवेश करुन घेऊ नये, असा निशाणा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी साधला. खडसेंनी आरोप करताना स्वतः केलेल्या उद्योगांवर विचार करावा. देवेंद्र फडणवीस यांच्यावर खडसेंनी केलेले आरोप चुकीचे आहेत. भाजपवर आरोप करण्यापेक्षा खडसेंनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं सल्ला, लाड यांनी दिला.

“एखाद्याची स्वप्ने जर त्याच्या इच्छेच्या पुढे जात असतील त्यास आळा घालणे शक्य नाही, असा टोला लगावतच, आरोप करणे सोप्पे असते मात्र ते सिद्ध करणे त्यापेक्षा कठीण असते. फक्त भाजपवरती किंवा पक्षातील एका नेतृत्वावरती आरोप करण्यासाठी एकनाथ खडसेंचा उपयोग होऊ नये. एकनाथ खडसेंच्या उपयोग राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राच्या विकास कामासाठी करावा,” असं देखील ते म्हणाले.

“भाजप पक्षात एकाधिकारशी नाही. भाजप पक्ष खडसेंना जास्त माहिती आहे. म्हणून खडसे ज्या पक्षात जात आहेत त्या पक्षाचा पूर्व इतिहास आणि पक्षातील एकाधिकारशाही त्यांनी अनुभवावी. त्यानंतरच त्यांनी जनतेसमोर यावे,” असा सल्ला देखील प्रसाद लाड यांनी खडसेंना दिला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like