‘एकनाथ खडसेंचं शक्तीप्रदर्शन किळसवाणं’ : प्रवीण दरेकर

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर जळगावासाठी रवाना झालेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या दौऱ्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी टीका केली आहे. प्रवीण दरेकर म्हणाले, शेतकरी अडचणीत असताना तुम्ही प्रवेश सोहळे, आनंद सोहळे आणि शक्तीप्रदर्शन करता याची खंत वाटते. शेतकऱ्यांवर संकट असताना शक्तीप्रदर्शन करणं किळसवाणं आहे असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

प्रवणी दरेकर म्हणतात, “कुठलीही व्यक्ती, कुठलाही नेता हा पक्षापेक्षा मोठा होत नाही. त्याची शक्ती ही कार्यकर्त्यांची शक्ती असते. परंतु शक्ती दाखवणं, ताकद दाखवण्यापेक्षा शेतकरी कमकुवत झाला आहे तिथं ताकद दाखवा” असा खोचक टोलाही त्यांनी खडसेंना लगावला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, “शेतकरी अडचणीत असताना तुम्ही प्रवेश सोहळे, आनंद सोहळे आणि शक्तीप्रदर्शन करता याची खंत वाटते. राज्यातील जनतेला याचा उबग आला आहे. याचे पडसाद येत्या काळात नक्की उमटतील. ही शक्ती जनतेच्या हितासाठी लावली पाहिजे. शेतकऱ्यांवर संकट असताना अशा संकटमय परिस्थितीत दौऱ्यात असं चित्र उभं करणं हे किळसवाणं आहे.”

‘पवार बोलतात त्याच्या विरोधात होतं’
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नाही असं वक्तव्य केलं होतं. त्याचाही समाचार दरेकरांनी घेतला आहे. राज्याला पवार साहेबांचा अनुभव आहे. ते नेहमी बोलतात त्याच्या विरोधात होतं. त्यामुळं मी कुठलीही गॅरंटी देत नाही की, मंत्रिमंडळात बदल होणारच नाहीत असा टोलाही दरेकरांनी लगावला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like