BJP and MVA Government | भाजपचा शिवसेनेला इशारा; म्हणाले – ‘तुम्ही जर दादागिरी करणार असाल, तर आम्ही…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात भाजप BJP आणि महाविकास आघाडी सरकारमधील (BJP and MVA Government) नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दोघेही एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारबद्दल नेमकं काय खटकतं ? राज्य सरकारने कारभारासाठी काय केलं पाहिजे ? या आणि अशा अनेक विषयांवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी भाष्य केलं. ते एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलत होते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

अस्मिता आणि सामाजिक ताकद राहिली नाही
यावेळी त्यांनी शिवसेना (Shivsena) आणि शिवसैनिक यांच्या कार्यपद्धतीत झालेल्या बदलावर बोलताना प्रवीण दरेकर (Pravin Darekar) म्हणाले, शिवसैनिकांची वृत्ती आता पहिल्यासारखी उरली नाही. सामाजिक बांधिलकी (Social commitment) ही शिवसेनेची ताकद होती. परंतु आता मात्र अस्मिता आणि सामाजिक ताकद (Identity and social strength) त्यांच्यात राहिली नाही.

पूर्वीच्या आणि आताच्या नेतेमंडळीमध्ये खूप फरक
शिवसेनेचे आधीचे नेतेमंडळी (Shivsena Leader) आणि आजचे नेतेमंडळी यांच्यामध्ये खूप फरक पडला आहे. सध्या ते सत्तेत आहेत. त्यांनी गुंडगिरीचे समर्थन करणे चुकीचे आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी (CM) त्यांचे स्वागत करणे यातून खूपच चुकीचा संदेश जातो, असे दरेकर म्हणाले. बुधवारी मुंबईतील शिवसेना भवनाजवळ (Mumbai Shiv Sena Bhavan) सेना-भाजप कार्यकर्ते आपसांत भिडले होते. तशातच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावरुन दरेकर यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

पर्यटकांनो लक्ष द्या ! सिंहगड, खडकवासला परिसरात जाताय, मग ‘हे’ वाचाच

पण तुम्ही दादागिरी कराल तर…
प्रवीण दरेकर पुढे म्हणाले, ‘सामना’ मधून नेहमी आमच्या विरोधात गरळ ओकली जाते. त्याच हा राग होता. आमचा राम मंदिरासंदर्भात (Ram temple) चौकशीला (inquiry) आक्षेप नाही. पण तुम्ही दादागिरी कराल तर आम्ही शांत बसणार नाही. आधी प्रसाद दिलाय आणि आता शिवभोजन थाळी (shiv bhojan thali) देणार असं काही शिवसैनिक म्हणत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की ते सगळं सोडून द्या. तुमचे जे दोन शिवसैनिक सचिन वाझे (sachin waze) आणि प्रदीप शर्मा (Pradip Sharma) आतमध्ये आहेत त्यांना भत्ता मिळेल की नाही याची तुम्ही काळजी घ्या, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला.

सरकार कुठल्याही क्षणी पडेल
प्रवीण दरेकर म्हणाले, आमचे प्रमुख नेते कधीच या तारखेला हे सरकार (Government) पडेल असे बोलले नाहीत.
पण मी आता सांगतो की कुठल्याही क्षणी सरकार पडेल,
पण आम्ही ते पाडण्याचे पाप करणार नाही, असे दरेकर यांनी स्पष्ट केलं.
ते पुढे म्हणाले, मोदींच्या (PM Narendra Moadi) विरोधात देशभर वातावरण निर्माण केले जात आहे.
लसीसाठी ग्लोबल टेंडर (Global tender for vaccine) का काडलं ?
त्यासाठी माणसं का आली नाहीत ? केवळ केंद्रालाच टार्गेट (target) का करण्यात आले ?
या सर्व प्रश्नांची उत्तरं आघाडी सरकारने द्यावीत, असेही दरेकर म्हणाले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web title : bjp leader pravin darekar warning to shivsena leader and cm uddhav thackeray

हे देखील वाचा

Pune News | ट्रकचालकांना लुटणार्‍या तीन दरोडेखोरांना 10 वर्षे सक्तमजुरी

Corona Vaccination | कोरोना प्रतिबंध लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी अत्यंत मोठी बातमी, जाणून घ्या