राधाकृष्ण विखे-पाटलांचं काँग्रेसबाबत मोठं विधान, म्हणाले…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सावरकरांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. तर दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून विरोधक मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. मात्र काँग्रेसमधून भाजपात आलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या आधीच्या पक्षावर चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे.

यावेळी राधाकृष्ण म्हणाले, मी ज्या पक्षातून आलो त्या काँग्रेस पक्षाच्या सिद्धांताची पाळंमुळंच आज उखडली जात आहेत. राज्यात सध्या असेच काहीसे घडताना आपण पाहतोय असे विखे म्हणाले. एकंदरीत देशात काँग्रेसची जी परिस्थिती आहे त्यावर विखे यांनी चांगलीच टीका केली. हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आलेले सर्व आमदार आज संघाच्या कार्यालयात जाणार आहेत.

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपवर चांगलीच टीका केली होती. त्यानंतर आता भाजपकडून देखील या टीकेला उत्तर द्यायला सुरुवात झाली आहे. ‘राम मंदिर चळवळ, स्वातंत्र्यवीर सावरकर, नागरिकत्व सुधारणा कायदा, समान नागरी कायदा, काश्मीर 370 याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना स्पष्ट शब्दात सांगणार का ?’ असा सवाल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/