‘मुंबईतील नाईटलाईफमुळं निर्भयासारखी हजारो प्रकरणं घडतील’, ‘या’ भाजपा नेत्यानं केला दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  शिवसेनेचे युवा नेते व पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी येणाऱ्या २६ जानेवारीपासून मुंबईमध्ये नाईटलाईफ सुरु करणार असल्याचे सांगितले होते. नाईटलाईफ संदर्भात मंत्रालयाने बैठक बोलवली होती आणि या बैठकीत प्रायोगिक तत्वावर नाईटलाईफला हिरवा झेंडा दाखविला आहे. मात्र या निर्णयाचा भाजपाकडून मोठा विरोध होताना दिसत आहे. भाजपाचे नेते राज पुरोहित यांनी दावा केला की, मुंबईत जर नाईटलाईफ सुरु झाले तर निर्भयासारखे हजारो प्रकरणे घडतील.

राज पुरोहित म्हणाले की, मुंबईमधील पब्ज, हॉटेल्स आणि मॉल्स २४ तास उघडे ठेवण्याचा प्रस्ताव आदित्य ठाकरेंनी मांडला आहे. परंतु यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात मद्य संस्कृती विकसित होईल आणि याचा परिणाम म्हणून महिलांवरील गुन्ह्यांत वाढ होईल आणि यातूनच निर्भयासारखे हजारो प्रकरणे मुंबईत घडतील. असे त्यांनी स्पष्ट केली.

दरम्यान आदित्य ठाकरे यांनी मुंबईमध्ये नाइटलाइफसाठीची मोठी घोषणा केली आहे. येत्या २६ जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफचा प्रयोग केला जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नरिमन पॉइंट, वांद्रे – कुर्ला संकुल, काळा घोडा अशा काही अनिवासी क्षेत्रातून या प्रोजेक्टची प्रायोगिक तत्वावर सुरुवात केली जाणार आहे. दरम्यान या भागातील मॉल, हॉटेल्स, दुकाने यांना २४ तास खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –