राज्यसभेचे भाजपचे नवनिर्वाचित खासदार अशोक गस्ती यांचं कोरोनामुळं निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कर्नाटकमधील भाजपचे नेते आणि राज्यसभेचे खासदार अशोक गस्ती यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांनी बंगळुरु येथे अखेरचा श्वास घेतला. कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना 2 सप्टेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कर्नाटक मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करणारे भाजप नेते अशोक गस्ती यांनी यावर्षी 22 जुलैला राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली होती.

कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात भाजप पक्ष आणि संघटना बळकट करण्याचे श्रेय अशोक गस्ती यांना दिले जाते. वयाच्या 18 व्या वर्षी ते भाजपमध्ये दाखल झाले. यानंतर ते कर्नाटक भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्षही होते.

गस्ती यांच्या आधी बुधवारी आंध्र प्रदेशमधील तिरुपती येथील लोकसभेचे खासदार बल्ली दुर्गा प्रसाद राव यांचे चेन्नईतील अपोलो रुग्णालयात निधन झाले होते. त्यांना देखील कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता. वायएसआर काँग्रेसचे नेते असलेल्या राव यांचे चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे निधन झाले. 15 दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी चेन्नईत दाखल करण्यात आले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like