महात्मा गांधींच्या चुकीमुळेच देशाची फाळणी झाली; भाजपा नेते रामेश्वर शर्मा यांचे वादग्रस्त विधान

पोलीसनामा ऑनलाईन : वांरवार वादग्रस्त विधान करून चर्चेत येणारे भाजपा नेते रामेश्वर शर्मा (BJP leader Rameshwar Sharma) यांनी पुन्हा एकदा विधान केले आहे. 1947 मध्ये महात्मा गांधी यांच्या चुकीमुळेच देशाचे दोन तुकडे झाले, असे विधान मध्यप्रदेश विधानसभेचे प्रोटेम स्पीकर व भाजपा नेते रामेश्वर शर्मा (BJP leader Rameshwar Sharma) यांनी केले आहे. या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भोपाळमधील गांधी नगर परिसरात आयोजित शेतकरी सन्मान कार्यक्रमात शर्मा यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शर्मा यांनी भारताच्या फाळणीसाठी महात्मा गांधींना जबाबदार ठरवले. शर्मा म्हणाले की, काय आहे…नावामुळे गैरसमज तयार होतात. दिग्विजय सिंह यांचे काम आणि व्यवहार मोहम्मद अली जिनापेक्षा जास्त धोकादायक आहे. आधी जिनांनी देशाचे विभाजन केले. 1947 मध्ये बापूंकडून चूक झाली आणि देशाचे दोन तुकडे पडले. तसे विभाजन सिंह करत आहेत, असे शर्मा यांनी म्हटले आहे.

 

 

 

 

 

शर्मा हे वांरवार वादग्रस्त विधान करतात. त्यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेत्यांविरुद्ध विधान केले होते. दगडफेक करणाऱ्याचे काँग्रेस समर्थन करत असेल, तर त्यांनी समोर यावे. काँग्रेस दगडफेकीच्या घटनांची जबाबदारी घ्यायला हवी. राज्यातील सामाजिक सौहार्द खराब करण्याची परवानगी कुणालाच नाही. त्यामुळेच सरकार कडक कायदे करण्यावर काम करत आहे, असे ते म्हणाले.