‘या’ मंत्र्यानं बारामतीतून अजित पवारांना पराभूत करण्यासाठी घेतली बेठक, BJP चा ‘प्लॅन’ !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून नेते मोठ्या प्रमाणावर राज्यात दौरे करत असून माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विविध दौरे करत या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

त्याचबरोबर दुसरीकडे सत्ताधारी शिवसेना आणि भाजपने देखील विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु केली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पराभूत करण्याचे मुख्य ध्येय त्यांनी ठेवले आहेयासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने भाजपने मोर्चेबांधणी सुरु केली असून बारामती विधानसभा संघावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच या विधानसभा निवडणुकीत देखील मोठ्या फरकाने विजय मिळवत पुन्हा सत्ता काबीज करण्याचे भाजप आणि शिवसेनेचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच भाजपने अजित पवार यांना टार्गेट करून त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत देखील भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना टार्गेट केले होते. यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात सभा घेऊन जंग पछाडले होते.

मात्र त्यांना हि जागा जिंकण्यास अपयश आले. त्यामुळे आता त्यांनी अजित पवार यांना टार्गेट केले असून मोठ्या प्रमाणात रणनीती आखली जात आहे.

RSS आणि भाजपच्या मंत्र्याची भेट
अजित पवार यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभूत करण्यासाठी भाजपने रणनीती आखली असून याचे पहिले पाऊल म्हणून राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांची आणि भाजप नेत्यांशी यासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत त्यांना कशाप्रकारे टार्गेट केले जाऊ शकते यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे यावेळी पवारांना त्यांच्या घरात शह देण्यासाठी भाजपने मोठ्या प्रमाणात तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –