‘मी येत आहे तुमच्या घरी, जाळून टाका’, खा. साध्वी प्रज्ञा ठाकूरांनी काँग्रेस आमदाराला ‘सुनावलं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशचे काँग्रेस आमदार गोवर्धन दांगी यांच्या जिवंत जाळण्याच्या धमकीनंतर भोपाळच्या खासदार आणि गोडसेबद्दल विधान करणाऱ्या भाजप नेत्या साध्वी प्रज्ञा सिंह यांनी टीका केली आहे. साध्वी प्रज्ञा सिंह म्हणाल्या की काँग्रेसचा जाळण्याचा जुना इतिहास आहे. त्यांनी गोवर्धन दांगींना सांगितले की त्यांनी त्यांना जाळून टाकावे.

साध्वी प्रज्ञा यांनी ट्विट करत सांगितले की काँग्रेसला जुळण्याचा जुना अनुभव आहे. 1984 मध्ये शिखांपासून ते नैना साहनी यांना तंदूरमध्ये जाळण्यापर्यंत. राहुल गांधीने दहशतवादी म्हणलं आणि त्यांच्या आमदार मला जाळणार. ठीक आहे. तर मी येत आहे, त्यांच्या निवासस्थानी मुल्तानपुरावर दिनांक 8 डिसेंबर 2019 ला संध्याकाळी 4 वाजता. जाळून टाका.

दांंगी म्हणाले की प्रज्ञाचा फक्त पूर्ण पुतळाच नाही तर ती येथे आली तर तिलाच जाळून टाकेल. यानंतर शुक्रवारी माफी मागताना सांगितले की मी हे विधान रागात येऊन अचानक केले होते. माझ्या बोलण्यात चुका तर आहेच ज्यासाठी मी माफी मागत आहे. याआधी राष्ट्रपिता महात्मा गांधींचे हत्यारा नथूराम गोडसेला देशभक्त सांगणारे विधान खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी लोकसभेत माफी देखील मागितली.

राहुल यांचे दहशतवादी म्हणणे महिलेचा अपमान –
संसदेत प्रज्ञा ठाकूर यांनी माफी मागताना सांगितले की जर माझ्या विधानाने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते. याशिवाय प्रज्ञा ठाकूर यांनी नाव न घेता राहुल गांधीवर निशाणा साधला आणि म्हणाल्या की संसदेच्या एका मोठ्या नेत्याने मला दहशतवादी म्हणले आहे. त्या म्हणाल्या की माझ्या विरोधात कोणतीही आरोप सिद्ध झालेला नाही. परंतू या प्रकारे एका महिलेबद्दल बोलणं अपमान करणारं आहे.

Visit : Policenama.com