भाजपाच्या ‘या’ महाभाग नेत्याची मुक्ताफळं, म्हणाला – ‘मोदींशी तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मानच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून देशात आणि महाराष्ट्रात वादंग उठले. अखेर भाजपने हे पुस्तक मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. यामुळे हे प्रकरण शांत होईल असे वाटत असतानाच भाजपच्या एका नेत्याने वादग्रस्त विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केलेली तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मान असल्याची मुक्ताफळे या भाजपच्या नेत्याने उधळली आहेत.

हे पुस्तक लिहणाऱ्या लेखकावर कारवाई का झाली नाही ? पुस्तकामुळे भडका उडाला व लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला. हे सर्व जाणूनबुजून करणाऱ्या लेखकाला भाजपमधून हकलून का दिले नाही ? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत असताना भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी ही मुक्ताफळे उधळल्याने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले हळवणकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराजांशी करणे चुकीचे नाही. या पुस्तकाच्या लेखकाचे आपण समर्थन करतो. या तुलनेत काहीही गैर नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान असल्याचे सुरेश हळवणकर यांनी भाजपच्या बैठकीत म्हटले आहे. शिवाजी महाराजांनी केलेले काम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेले कामकाजात साधार्म्य असल्याचा दावा हळवणकरांनी केले आहे. मोदी राबवत असलेल्या योजनांचे दाखले देत आपल्या वक्तव्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/