धक्कादायक ! भाजप नेत्याच्या गोळीबारात सैन्यातील जवान जखमी

पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात कोरोनाचा कहर वाढत असताना मध्य प्रदेशात सत्ताधारी भाजपच्या एका नेत्याची मगुृरी समोर आली आहे. संबंधित नेत्याने लष्करी जवानावर गोळी झाडली. मुरैना जिल्ह्यात काल ही घटना घडली. घटनेत जवान जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयात जवानावर उपचार सुरु आहेत.

वर्तमान नगरपालिकेचे उपाध्यक्ष नीतू तोमर आणि त्यांच्या साथीदारांवर अंशू तोमर यांच्यावर गोळी झाडल्याचा आरोप आहे. अंशू तोमर सैन्यात आहेत. गोळीबाराची घटना घडली, त्यावेळी अंशू तोमरचा मित्रही तिथे उपस्थित होता. त्यानेच भाजप नेत्यावर गोळी चालवल्याचा आरोप केला आहे. अंशू तोमर व नीतू तोमर यांच्यात जुने भांडण होते. अंशू तोमर मेरठमध्ये तैनात होता. दोन दिवसांच्या सुट्टीवर तो मुरैना येथे आला होता. त्यावेळी भाजप नेता नीतू तोमर बरोबर गाठ पडली. त्यानंतर नीतू तोमरने साथीदारांसह अंशूच्या बाईकचा पाठलाग करुन मिढेला गावाजवळ त्याच्यावर गोळी झाडली. पोलिसांना गंभीर जखमी असलेल्या जवानांला ग्वालियर येथे दाखल केले आहे.