भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, मुलगाही हल्ल्यात गंभीर जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपा नेते आणि आरटीआय कार्यकर्ते झुल्फिकार कुरैशी (BJP leader and RTI activist Zulfiqar Qureshi) यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. तर या हल्ल्यात झुल्फिकार यांचा मुलगाही जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंंताजनक आहे. दिल्लीतील नंदनगरी परिसरातील सुंदरनगरी येथे सोमवारी (दि. 23) सकाळी ही घटना घडली आहे.

झुल्फिकार हे सकाळी नमाज पढण्यासाठी जात होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी मशिदीच्या बाहेर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यासोबतच हल्लेखोरांनी झुल्फिकार कुरेशी यांच्या मुलावरही हल्ला केला आहे. माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत झुल्फिकार कुरेशी यांच्या मुलाला स्वामी दयानंद रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच पोलिसांनी या हल्ल्याची चौकशी सुरू केली आहे. झुल्फिकार कुरैशी यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच कुटुंबीयांकडे चौकशी केली जात आहे. मात्र पोलिसांकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

You might also like