अचानक नैसर्गिक आपत्ती जाहीर करण्याची गरज सरकारला का वाटली?, भाजपचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाने कहर केला असून, दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य शासनाने राज्यात कडक निर्बध लावू केले आहे. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना ही नैसर्गिक आपत्ती समजून महाराष्ट्रातील गरीब, दुर्बलांना लॉकडाऊनच्या काळात अर्थसहाय्य करा, अशी विनंती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली होती. याच मुद्यावरून भारतीय जनता पार्टीने आता मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे.

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, ही मुख्यमंत्री यांना केलेली दिशाभूल की त्यांचीच दिशाभूल? वर्षभरापासून केंद्र सरकारकडून आपत्ती निवारण कायद्याच्या अंतर्गत काम चालू आहे. मागील वर्षीचा लॉकडाऊनचा आदेश पाहा. अचानक नैसर्गिक आपत्ती जाहीर करा अशी मागणी करण्याची गरज राज्य सरकारला का वाटली? आणि आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत करण्याची परवानगी मागितली जात आहे?, असा प्रश्न उपाध्ये यांनी केलाय. तर हक्काचे पैसे आगाऊ देणार आहेत, सहाय्य नाही मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा गोडगोड शब्द वापरून जनतेची दिशाभूल केली आहे. मुळात राज्य शासन हे विविध योजनांच्या लाभार्थ्यांना ‘आगाऊ’ पैसे देणार आहेत. जे की त्यांच्या हक्काचेच आहेत. त्याहुन अधिक असे अर्थिक सहाय्य मुख्यमंत्री देत नाहीये. अशा शब्दात उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

दरम्यान, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील केंद्राच्या वाट्याचा पहिला हप्ता लगेच मिळावा. लघुउद्योग, स्टार्ट अप्स, व्यवसाय यांनी केंद्राच्या विविध योजनांत बँकांकडून कर्जे घेतली आहेत. त्यांच्याकडून पहिल्या तिमाहीत हप्ते न स्वीकारण्याच्या सूचना बँकांना द्याव्यात. मार्च, एप्रिलची जीएसटी परतावा मुदत आणखी ३ महिने वाढवून मिळावी. असते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.