‘PM मोदी लवकरच इम्रान खानसोबत लंडनमध्ये भोजन करतील’ – भाजप खासदार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध ताणले जात असतानाच भारत आणि पाकिस्तान या देशातील व्यापार सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यावरून आता भाजप खासदाराने वक्तव्य केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे काही दिवसांतच लंडनमध्ये सहभोजनाचा आस्वाद घेताना दिसतील’.

पाकिस्तान संदर्भातील मोदी सरकारच्या धोरणांवरून भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्याकडून टीका केली जात आहे. एका ट्विटर युजरने काश्मीर प्रश्नी सुब्रमण्यम स्वामी यांना टॅग केले होते. त्यावर उत्तर देताना स्वामी यांनी मोदी सरकारवर टीका केली. त्यामध्ये ते म्हणाले, ‘पाकव्याप्त काश्मीर (POK) आता विसरा. काश्मीर प्रश्नी शरणागती पत्करली आहे. येत्या काही दिवसांतच पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान लंडनमध्ये सहभोजनाचा आस्वाद घेताना दिसतील’, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले.

दरम्यान, सतत काहीना काही वादग्रस्त वक्तव्य करून सुब्रमण्यम् स्वामी नेहमी चर्चेत असतात. भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या संबंधांवर समाधानी आहात का, असा सवाल त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर स्वामी म्हणाले होते, ‘पाकव्याप्त काश्मीरवर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र करणे हे आता विसरून गेले पाहिजे’.